आम्ही तीन " मेरीकर " ....म्हणजे " मेरी " या संस्थेतून सेवानिवृत्त झालेले. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याशी संबंधीत सर्वांना " मेरी " हे प्रकरण काय आहे ते माहिती आहे. मेरी ( "MERI " ) म्हणजे Maharashtra Engineering Research Institute. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याची स्थापत्य अभियांत्रिकीची एक नामवंत संशोधन संस्था ! ही नाशिकला आहे.
फोटोतील मी , आदरणीय श्री. खरे साहेब व माझे परमस्नेही श्री. दिलीपराव कुलकर्णी उर्फ DGK , तिघेही या संशोधन संस्थेत वैज्ञानिक म्हणून , कार्यरत होतो . तिथूनच आता सेवानिवृत्त झालो आहोत. या संस्थेत जे जे वैज्ञानिक नोकरीत होते त्या सर्वांना या संस्थे विषयी अत्यंत जिव्हाळा आणि आदर आहे. आम्ही तिघेही मृद यांत्रिकी ( Soil Mechanics) या विभागात बरेच वर्षे कार्यरत होतो.
सन १९७० ते १९८५ हा मेरी या संशोधन संस्थेचा सुवर्णकाळ होता. या काळात प्रत्येक विभागातून राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन प्रबंध गौरविले गेले आहेत. त्या काळातील अधिकारी संशोधनाला मानणारे व संशोधनाला प्रोत्साहन देणारे होते. या काळातील श्री. अ. रा. कुलकर्णी , श्री. श्री. भ. सोहोनी , श्री. गजपथी राव , श्री. ढेकणे , श्री. न. कृृृ. फडके , श्री. मुंडीवाले , श्री. पत्तीहाळ इत्यादी संशोधन अधिकारी आणि सर्वांत मुख्य म्हणजे मेरीचे संचालक श्री. पां. कृृृृृृ. नगरकर यांची आठवण या निमित्ताने झाल्या शिवाय रहात नाही.
पुढे काळ बदलला. आता मेरी या संस्थेची अवस्था कशी आहे त्या विषयी सांगणे ही कठीण आहे. मला श्री. खरे साहेबांना व DGK यांना सेवा निवृत्त होउन बराच कालावधी गेलेला आहे. संस्थेकडे विशेष जाणे होत नाही. पण त्या संस्थेशी संबंधीत कोणीही आजही भेटलं की आपुलकी वाटते , जिव्हाळा वाटतो.
अशाच एका समारंभाचे निमित्ताने आम्ही तिघे एकत्र भेटलो , त्या वेळचा हा फोटो........

No comments:
Post a Comment