Saturday, 13 April 2019

श्री. ए. एम. कुलकर्णी...अत्यंत सज्जन स्नेही.

खाली प्रसन्न चेहर्‍याचे जे दिसत आहेत , ते म्हणजे माझे
 " मेरी " स्नेही श्री. ए. एम्. कुलकर्णी. AM म्हणजे शांत स्वभावाचे व कुणाचे ही नेहमी हसत मुखाने स्वागत करणारे व्यक्तीमत्व ! आवाजात एक प्रकारचे विशिष्ट मार्दव ! AM कधी ही कुणावर रागावलेले मी तरी पाहिले नाहीत व दुसर्‍या कुणी पाहिले असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतच असतात. पण अशा चढउताराने AM विचलित होत नसावेत अशी माझी समजूत आहे. कारण त्यांच्या चेहर्‍या वरचं प्रसन्न हास्य कधी ही मावळलेलं मी पाहिलेलं नाही.
मेरी या शासकीय आॅफिसात ते लघू टंकलेखक ( Steno typist )या पदावर कार्यरत होते. कामाच्या निमित्ताने त्यांचा उच्च पदस्थ अधिकार्‍यांचा संबंध यायचा . खूपशा गोपनीय ( Confidential ) गोष्टी त्यांना माहिती असायच्या. पण त्यांनी त्या गोष्टी " या कानाच्या त्या कानाला " कधी ही कळू दिल्या नाहीत. त्या मुळे ते वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदराला नेहमीच पात्र ठरायचे. AM ना सेवानिवृत्त होउन बारा ते चौदा वर्षे झाली असावीत. पण अजूनही त्यांचा त्या वेळच्या अधिकार्‍यांशी घनिष्ठ संबंध आहे. त्यांचे एकमेकांचे एकमेकांना वेळोवेळी आवर्जून फोन होत असतात.
AM यांचा मुलगा चि. अमित हा वकील आहे. तो ही त्यांच्या सारखाच शांत स्वभावाचा आहे. चि. अमितचे लग्न ठरविण्यात माझा थोडाफार सहभाग होता. त्या वेळी AM यांचे मन किती मोठे आहे , ते प्रकर्षाने मला जाणवले. आपल्या भावी सुनेला कोणता ही त्रास होउ नये याची अटोकाट काळजी ते घेत होते व आहेत. हे त्यांच्या मनाचे आगळे वेगळे मोठेपण आहे .
AM यांना नातेवाईक ही भरपूर आहेत. सर्वांशी त्यांचा स्नेहसलोखा अतिशय उत्तम आहे.
AM यांना बर्‍याच वर्षापूर्वी angioplasty करून घ्यायला सांगीतली होती. त्या वेळी उपलब्ध माहिती नुसार दुधी भोपळ्याचा रस रोज घेतल्याने ह्रदयातील अडथळे दूर होतात , हे कळल्यावर AM कित्येक वर्षे दुधी भोपळ्याचा रस घेत असत . कांही कालावधी नंतर त्यांचे ह्रदयातील अडथळे दूर झाल्याचे तपासणी नंतर अढळले होते. हा एक चमत्कारच आहे असे आम्हाला वाटत होते. पण नंतर कांही वर्षांनी  नुकतीच त्यांना ह्रदयशस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. आता त्यांची तब्बेत उत्तम आहे.
सौ. वहिनी ही शासकीय नोकरीत होत्या. दोघेही आता सेवानिवृत्त आहेत. घरातील कारभार आता त्यांचा मुलगा व सून पाहतात.
AM व मी नाशिकमध्येच रहात असलो , तरी आमच्या घरात खूपच अंतर असल्याने नेहमी भेट होत नाही. पण कधी भेट झाली तर आम्हा दोघांना खूप आनंद होतो. जुन्या गप्पा निघतात वआम्ही दोघे ही त्या गप्पांच्या आनंद सागरात डुंबून जातो. पण त्या मुळे अजूबाजूचे बसलेले  बोअर होतात , याचे आम्हाला भान ही रहात नाही.
AM ना एक छान गोड नातू आहे. नातवा सोबत स्वतःच्या बंगल्यात मुलगा आणि सून यांच्या सहवासात, ते आनंदात असतात. श्री. AM व सौ. वहिनींना परमेश्वराने उदंड व निरामय आयुष्य द्यावे , अशी सदिच्छा व्यक्त करतो व थांबतो !

No comments:

Post a Comment