सोबत जो फोटो आहे त्यात लिहीले आहे " जिलबी चौक ".. हे वाचून कोणाला ही प्रश्न पडेल की , हा असला कसला चौक ? जिलबी सारखा गोल गोल फिरायला लावणारा असेल , म्हणून जिलबी चौक हे नाव दिले असेल. हा कुठल्या गावातला चौक आहे , असा ही प्रश्न पडण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. हा चौक मिरज शहरातला आहे. या चौकाचे नाव जिलबी चौक पडण्याचे कारण म्हणजे ,या चौका पासून मिरजेतील मंगल कार्यालये सुरू होतात. एके काळी लग्न किंवा मुंज म्हटलं की, मुख्य जेवणाचे पक्वान्न जिलबीच असायचे ! सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे असे, हे पक्वान्न होते.
मिरजेत ब्राह्मण पुरी नावाचा भाग आहे. त्यात या जिलबी चौका पासून पहिले लागते, ते गोरे मंगल कार्यालय , नंतर येतो तो सुरभी हाॅल , नंतर लवांकुश हाॅल , गजानन मंगल कार्यालय , दत्त मंगल कार्यालय ( हे सध्या बंद आहे ), काशिकर मंगल कार्यालय , तुलसीदास राम मंदिर कार्यालय आणि आता नवीन झालेला अळतेकर हाॅल ! अशी एका पाठोपाठ आठ कार्यालये, एकाच गल्लीत आहेत.
एके काळी पुण्यानंतर ,सर्व सुविधा देणारी कार्यालये ,फक्त मिरजेतच होती. कर्नाटकात लग्नसराईत म्हणजे उन्हाळ्यात ,पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. त्या मुळे कर्नाटकातील बरीच कार्ये ,मिरजेत व्हायची. मिरज जंक्शन असल्याने ,कधी ही आणि कुठून ही, रेल्वेने येणे जाणे सोयीचे पडते. लग्नाचा मुलगा बंगलोरचा आणि मुलगी मुंबईची ,मग मिरज मध्यावर असल्याने, कार्य मिरजेत असायचे. शिवाय पुण्या मुंबई पेक्षा मिरजेच्या कार्यालयांची भाडी , जेवणाचा दर बराच कमी असायचा. सर्व सामान्यांना तसेच श्रीमंतांना ही ,मिरजेत कार्य करून देणे परवडायचे.
मिरजेच्या गोरे मंगल कार्यालयाचे मालक, ( कै) चिंतामणराव गोरे सांगायचे की , साधारण १९७० ते ८० या कालावधीत त्यांच्या कार्यालयात, वर्षाला १३० ते १५० कार्ये व्हायची. कार्ये म्हणजे त्यात लग्न , मुंज , बारसे , डोहाळ जेवण , मंगळागौरी इत्यादींचा समावेश असायचा. आता गावोगावी, एका पेक्षा एक सरस कार्यालये झाली असल्याने ,मिरजेतील कार्यालयात होणार्या कार्यांचे प्रमाण ,खूपच कमी झाले आहे.
१९७० ते ८० या दशकाचा मी वर उल्लेख केलेला आहे , त्या कालावधीचे आणखीन एक वैशिष्ठ्य होते. समजा ,तुम्ही जेवणाचे तुमचे चारशे पान सांगीतले आणि प्रत्यक्षात झाले सव्वातीनशे , तर कार्यालयवाले तुमच्या कडून फक्त जेवलेल्याच पानांचे पैसे घ्यायचे. ते म्हणायचे की , न जेवलेल्या पानांचे पैसे आम्ही घेणार नाही. अशी दानत होती , एकेकाळी !
पण कालमान परिस्थिती प्रमाणे मिरजेचे कार्यालयवाले आता , तुम्ही सांगाल तेवढ्या पानांचे पैसे घेतात. बदलत्या परिस्थिती नुसार ते योग्य ही आहेच ! या सर्व एकाच गल्लीतील कार्यालयांना, ( अळतेकर हाॅल सोडून ) पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाचे स्वतंत्र पार्किंग नाही. आता वाहने ही भरपूर झाल्याने , उन्हाळ्यात सर्व कार्यालयात एकाच वेळी कार्ये असतील तर, त्या वेळी रस्ता चालायला ही शिल्लक रहात नाही , अशी अवस्था होते. तरी पण मिरजेतच कार्य करण्याची, लोकांची आज ही हौस असते. अशी आहे आमच्या मिरजेच्या " जिलबी " चौका पासून, सूरू होणार्या कार्यालयांची सुरस कथा....
( जिलबी चौक फोटो....सौजन्य श्री. विनायकराव गोवित्रीकर )

No comments:
Post a Comment