गेल्या रविवारी गुरू पौर्णिमा झाली. तथाकथित अध्यात्मिक गुरूंचा आश्रम ,माझ्या एका मित्राच्या घरा जवळ आहे. ते अध्यात्मिक गुरू, सध्या त्यांच्या कांही " कर्मा " मुळे " बंदिवान " आहेत. आता अशा परिस्थितीत ,त्या आश्रमात गुरू पौर्णिमेला ,अजिबात गर्दी नसणार, असा माझा समज होता. पण माझ्या मित्राने सांगीतल्या प्रमाणे, तेथे तोबा गर्दी होती. मग मी स्वतः पहायला गेलो. मी पण आश्चर्यचकीतच झालो. त्या आश्रमा समोरच, एक वडाचे झाड होते. त्या वडाच्या झाडात ,त्या तथाकथित अध्यात्मिक गुरूंनी, आपले तेज सामावल्याने ,तो वृक्ष " कल्पवृक्ष " झाला असून , त्याला प्रदक्षिणा घातल्यास, आपली मनोकामना पूर्ण होते. हा विश्वास त्यांच्या शिष्यांना असल्याने ,अक्षरशः झुंडीने भक्तगण त्या वृक्षाला , जप करीत प्रदक्षिणा घालीत होते. माझ्या मित्राने सांगीतल्या प्रमाणे , इतर दिवशी ही केंव्हा ही पाहिले तरी ,लोक त्या वृक्षाला मनोकामना पूर्ण होइल या आशेने, प्रदक्षिणा घालीत असतात. आता याला काय म्हणावे ? अतूट श्रध्दा की अंध श्रध्दा ?
हे कांहीच नव्हे. माझ्या मित्राने या पुढे जाउन, जे सांगीतले ते ऐकून मी अाश्चर्याने थक्कच झालो. त्या बंदिवासात असलेल्या अध्यात्मिक गुरूंचे एक शिष्य, त्याच्या परिचयाचे आहेत. त्या शिष्याच्या प्रतिपादना नुसार , ते गुरू बंदिवासात का आहेत ? तर, त्यांनी आपल्या शिष्यांची पापे ,आपल्याकडे घेतली आहेत . ते आपल्या शिष्यांच्या साठी बंदिवासात राहून ,त्या पापांचे परिमार्जन करित आहेत. थोडक्यात काय तर , शिष्यांच्या साठी गुरू शिक्षा भोगीत आहेत.
हे ऐकून मला भरून आलं ! धन्य ते गुरू व धन्य ते शिष्य ! अशी अढळ ( अंध )श्रध्दा हवी.
मग माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की, श्रीमदभगवत गीतेत भगवंतांनी सांगीतले आहे , ज्याला त्याला आपल्या कर्माचे फल ,भोगावेच लागते. पण येथे तर गुरू, शिष्यांच्या कुकर्मा साठी , स्वतः क्लेष म्हणजे साक्षात तुरूंगवास भोगत आहेत ,अशी त्यांच्या शिष्यांची श्रध्दा आहे.
खरं काय आणि खोटं काय कांही समजेनासं झालय !
याला अतूट श्रध्दा म्हणायचं की अंध श्रध्दा ?

No comments:
Post a Comment