आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स " या ग्रुप मध्ये,श्री. जयप्रकाश जोशी उर्फ जोटो (JOTO), या नावाचे एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व आहे . ते उद्योगपति आहेत. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ,कंपनीचे नाव JOTO असल्याने ,आम्ही त्यांना "जोटो" या नावानेच हाक मारतो. श्री. जोटो ,म्हणजे एकदम मोकळं ढाकळं व्यक्तीमत्व ! पण तितकेच करारी ! अन्याया विरूध्द शेवट पर्यंत ,लढण्याची हिंमत राखणारे !
त्यांचा जन्म, अतिशय सामान्य कुटूंबात झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच ! त्यामुळे शिकण्याची इच्छा असून ही ,त्यांना त्या काळात त्यांना SSC च्या पुढे, शिक्षण घेता आले नाही. पण केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर आणि परिश्रमाने, त्यांनी आज नाशकात स्वतःचा कारखाना उभा केला आहे. त्यात छोटी छोटी ( मिनिएचर ) ग्रायंडिंग व्हिल्स बनविली जातात. मोठी ग्रायडिंग व्हिल्स बनविणारे ,खूप उद्योजक आहेत. पण मिनिएचर ग्रायडिंग व्हिल्स बनविणारे ,जगात फक्त पाच उद्योजक आहेत. त्या पैकी एक श्री. जोटो आहेत. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्या उत्पादना पैकी ,जवळ जवळ १०० % उत्पादन ,जगात ३५ देशात निर्यात होते . आपल्या देशाला त्या मुळे ,भरपूर परकीय चलन मिळते. त्यांचा मुलगा ,त्यांना या व्यवसायात मदत करतो.
अशा उद्योगपति श्री. जोटोंना ,नुकत्याच झालेल्या " मॅग्नेटिक महाराष्ट्र " या समारंभात, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्फत ,पारितोषिक देउन गौरविण्यात आले. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीचा ,आमच्या ग्रुपला अतिशय अभिमान आहे.
आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी ,आमच्या ग्रुप तर्फे, श्री. जोटोंना सन्मानचिन्ह देउन, आम्ही सत्कार केला. त्या वेळी सन्मानचिन्हासह काढलेला हा फोटो !
परमेश्वराने श्री. जोटोंना, त्यांच्या प्रत्येक कामात यश द्यावे व त्यांच्या कर्तृत्व यशाची गुढी ,अशीच उंच उंच जात राहू दे ,अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो.

No comments:
Post a Comment