दि. ८ आॅक्टोबर २०१७ , या दिवशी नाशिकमध्ये " महा मॅरॅथाॅन " ,आयोजित करण्यात आली होती. या मॅरॅथाॅन मध्ये भाग घेणे, माझ्या मनात ही नव्हते. पण आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, ८२ वर्षांचे " तरूण " सेवानिवृत्त प्राचार्य, श्री. एस. डी. कुलकर्णी सरांनी या बाबतीत विचारल्यावर , चला सरांना कंपनी देउ , या विचाराने मी त्यांच्या बरोबर ,या " महा मॅरॅथाॅन मध्ये भाग घ्यायचे ठरवले. या महा मॅरॅथाॅन मध्ये तीन सेगमेंट्स होते. पहिला २१ किमी चा " अर्ध मॅरॅथाॅन ". दुसरा १० किमी चा , तिसरा ५ किमी चा , चौथा ३किमी चा ! तीन किमीचा सेगमेंट, सिनीयर सिटीझन्स साठी होता. पण आम्ही स्वतःला सिनीयर सिटीझन्स समजत नसल्याने, तसेच १० किमी मध्ये भाग घेण्या एवढे ,तरणे बांड नसल्याने " झाकली मुठ , सव्वा लाखाची " ,या म्हणीला अनुसरून ५ किमीच्या सेगमेंट मध्ये, आम्ही भाग घेतला.
या वयात म्हणजे ७२ व्या वर्षी ,असल्या कांही उचापती करणार म्हटल्यावर, बर्याच जणांच्या कडून वेगवेगळ्या सूचनांचा पाउस ,आमच्यावर पडला. त्या सर्व सूचनांचा अर्थ एकच होता , " जरा जपून पळा , तुम्ही वृध्द आहात याची जाणीव ठेवा , अचरटपणा करू नका "
रोज सकाळी मी ३.५ किमी फास्ट चालतोच ! मी हे ५ किमीचे अंतर सहज पार करू शकेन, असा मला विश्वास होता. श्री. एस. डी. के. सर मात्र, सकाळी फिरताना मधून मधून ,पळायची प्रॅक्टीस करायचे. माझे गुडघे दुखत असल्याने, आपण पळायचे नाही , फक्त छान एंजाॅय करायचे ,असे मी ठरविले होते.
शेवटी मॅरॅथाॅनचा दिवस उगवला. सकाळी सहा वाजता ,नाशिकच्या गोल्फ ग्राउंडवर जमायचे होते. माझा उत्साह पाहून, सौ. रजनी मला " चिअर अप " करण्यासाठी येणार ,असं म्हणाली. मग सौ. एस. डी. कुलकर्णी वहिनीही ,यायला तयार झाल्या. आम्ही चौघे माझ्या कारने, गोल्फ मैदानावर गेलो. गाड्या पार्किंगचा प्राॅब्लेम होईल असे वाटत होते. पण तसे कांही झाले नाही. पार्किंगची नीट व्यवस्था ,शेजारच्या " इदगाह " मैदानावर, करण्यात आली होती. तिथून गोल्फ मैदानाकडे जाणार्या वाटेवर, हिरव्या रंगाचे नेट अंथरले होते . प्रत्यक्ष मैदानात प्रवेश करताना, ज्यांनी मॅरॅथाॅनचा युनिफाॅर्म घातलेला आहे , त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची वृष्टी, बाजूला उभ्या असलेल्या तरूणी करत होत्या. या स्वागताने मन भरून आले.
मैदानावर प्रवेश करताच, समोरच्या स्टेजवर " झुंबा " डान्स करणारी एक तरूणी, दिसत होती. तिच्या मागच्या मोठ्या पडद्यावर ,प्रेक्षक व ती नाचणारी तरूणी, " मोठ्या ठळक "स्वरूपात दिसत होते. हे मॅरॅथाॅन सूरू होण्या पूर्वीचे, वाॅर्मिंग अप होते. तिथे हजर असलेल्या चार पाच हजार लोकापैकी, फारतर दहा टक्के लोक तिचे हावभाव पाहून त्या प्रमाणे, वाॅर्मिंग अप करण्याचा प्रयत्न करीत होते. बाकीचे नुसतेच एंजाॅय करत होते. तिथले म्युझिक , झुंबा नृत्य व जिकडे तिकडे मॅरॅथाॅनचा, एकसारखा युनिफाॅर्म घातलेले लोक...एकूण माहौल मोठा प्रसन्न होता. सकाळी सकाळी छान वाटले , आपण या उपक्रमात भाग घेतल्याचे समाधान जाणवले.
सातला आमची मॅरॅथाॅन सुरू होणार होती. पावणे सातला ,मैदाना वरून त्र्यंबक रोडवर जावे ,अशी सूचना मिळाली. मैदानातून जाताना, मी सौ. रजनीला व सरांनी त्यांच्या मिसेसला, जणू कांही आपण महायुध्दावर निघाल्या प्रमाणे, निरोप दिला. त्या दोघींच्या ही डोळ्यात, कधी नव्हे ते, आपल्या नवर्या बद्दल, कौतूकाचे भाव दिसले व आम्ही मार्गस्थ होण्यासाठी रोडवर निघालो.
रोडवर तुडुंब गर्दी होती. फोर लेनच्या रोड वरील ,आमच्या बाजूची लेन, पोलीसांनी केवळ स्पर्धकांसाठी ,राखीव ठेवली होती. समोर मोठ्ठे घड्याळ लावले होते. त्यात सहा पंचावन्न ही वेळ दिसत होती. आता ही पाच मिनिटे कधी संपतात, याची उत्सुकता सर्वांच्या चेहर्यावर दिसत होती. शेवटचे दहा सेकंद उरल्यावर ,उत्सुकता शिगेला पोचली व सर्वजण ओरडून एक्कावन , बावन् , त्रेपन्न .....एकोणसाठ आणि सहावाजून साठ मिनिटे होताच, सर्व स्पर्धक धावायला लागले. आम्हाला धावायला जागा मिळून ,प्रत्यक्ष धावायला सुरवात करण्यासाठी ,दोन मिनिटे लागली. तुतारी , पिप्पाणी , ताशे , ढोल या वाद्यांच्या गजरात ,आम्ही जग जिंकायला निघालेल्या नेपोलियन बोनापार्टच्या भूमिकेत ,कधी शिरलो ते समजलच नाही.
आणि मॅरॅथाॅन सुरू झाली. .....एक अविस्मरणीय अनुभव, या मॅरॅथाॅनने मला दिला व आयुष्य आणखीन समृद्ध झाले........

खुप छान काका... एक वेगळाच उत्साह आला.
ReplyDeleteMast Kaka
ReplyDelete