खालील फोटो मधील व्यक्तीमत्वाला नाशिकमध्ये ओळखत नाही , अशी व्यक्ती सहसा तुम्हाला सापडणारच नाही. हे आहेत नाशिक मधील पंचवटी परिसरातील एका मोठ्या शिक्षण संस्थेचे माजी संचालक आणि सध्याचे " सावाना " ( सार्वजनिक वाचनालय , नाशिक ) चे अध्यक्ष श्री. विलासराव औरंगाबादकर ! यांचे फार्मसीचे उच्च शिक्षण झालेले आहे. ते फार्मसी काॅलेजचे प्राचार्य ही होते. नंतर ते त्या शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा प्रमुख झाले. त्यांच्या प्रमुखपदाच्या कारकीर्दीत त्यांनी त्यांच्या संस्थे अंतर्गत इतर अनेक काॅलेजेस उघडून संस्था नावरूपास आणली. आज काल संस्था चालक किंवा संस्था प्रमुख म्हटलं की माणसे संशयाने पाहतात. पण आपल्या स्वच्छ चारित्र्याने व संशयातीत सचोटीने संस्था नावरूपास आणणारे श्री. विलासरावांच्या सारखे श्री. विलासराव हे एकमेवाद्वितीयच !
गोरापान रंग , राजस शरीरयष्टी , कायम प्रसन्न हसतमुख चेहरा , डोक्यावरचे पांढरे केस " उडती केस भुरू भुरू " स्टाईलचे , असे देखणे व्यक्तीमत्व म्हणजे श्री. विलासराव औरंगाबादकर !
आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपचे श्री. विलासराव औरंगाबादकर म्हणजे एक अविभाज्य भाग आहेत. आम्ही सर्वजण ट्रॅकवर फिरताना एक , दोन , तीन असे प्रत्यक्ष फिरून घामाघूम होउन राउंड मारतो. पण या बाबतीत श्री. विलासरांचे गणित सुध्दा त्यांच्या स्वभावा प्रमाणे राजस आहे. ट्रॅकवर आल्यावर डाव्या बाजूला बघीतले की एक राउंड पूर्ण झाला असे मानायचे , उजव्या बाजूला बघीतले की दुसरा राउंड पूर्ण झाला असे मानायचे , प्रत्यक्ष चालताना कुणी ओळखीचे भेटल्यास पुढे जाण्याच्या ऐवजी तसेच मागे फिरायचे व पुढचा राउंड सुरू झाला असे मानायचे....अशा प्रकारे आमच्या जाॅगिंग ट्रॅकवर श्री. विलासराव आठ ते दहा राउंड सहज मारतात. एवढे राउंड मारून झाल्यावर त्यांच्याकडे पाहिले , तरी ते एकदम फ्रेश व सतेजच दिसतात. विनोदाचा भाग सोडून द्या . पण श्री. विलासराव ट्रॅकवर दिसले नाही तर आम्हा सर्वांनाच चुकल्या चुकल्या सारखे होते हे मात्र नक्की !
श्री. विलासरावांचे वडील कै. मु. शं. औरंगाबादकर हे " ग्रंथ मित्र " पुरस्काराने सन्मानित होते. त्यांचा वारसा श्री. विलासराव समर्थपणे चालवत आहेत.
श्री. औरंगाबादकरांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे साखर इत्यादी पदार्थांचा होलसेल दराने व्यापार करणे. श्री. विलासरावांचे वडील कै. मु. शं. औरंगाबादकर आपला व्यवसाय सांभाळून साहित्य सेवा करीत असत. श्री. विलासराव यांनी ही आपला पारंपारिक व्यापाराचा व्यवसाय सांभाळून शिक्षण क्षेत्रात मोठे नाव कमविले व आता ते नाशिकच्या सर्वात जुन्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळत आहेत. तसेच ते चिन्मय मिशनचे पदाधिकारी ही आहेत.
आमचे श्री. विलासराव औरंगाबादकर म्हणजे हरहुन्नरी व सदाबहार व्यक्तीमत्व आहे.
त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एक आॅस्ट्रेलियात असतो व एक नाशकातच असतो. सुना आणि नातवंडे यांनी त्यांचे घर भरलेले असते. सौ. रंजना वहिनींची त्यांना समर्थ साथ आहे. माझ्या दृष्टीने श्री. व सौ. औरंगाबादकर म्हणजे जणू " लक्ष्मी नारायण " च !
अशा या आमच्या स्नेही श्री. विलासरावांच्या घरी सर्वप्रकारचे सुख व समाधान आहेच !
त्यांना व सौ. रंजना वहिनींना उदंड व निरामय आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment