मी रोज संध्याकाळी, सहा ते साडेसात, आठवीच्या मुलांना गणित व सायन्स , हे विषय शिकवायला जातो . त्या मुलांचाच्या समवेत ,शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी, काढलेला फोटो !
फोटोत माझ्या सोबत उभ्या आहेत त्या, सौ, सुधा मेहता. यांनी बारा वर्षा पूर्वी ,ज्या मुलांना खासगी क्लासची फी परवडत नाही, त्यांना मोफत शिकविण्याचा उपक्रम सुरू केला. आज तागायत तो उपक्रम, अविरतपणे चालू आहे. पाचवी ते दहावी या वर्गातील तील मुले, यात शिकतात. या मुलांच्या पालकांचे उत्पन्न ,अतिशय कमी आहे. कोणी वाॅचमन आहेत , कोणी रंगारी आहेत , कोणी न्हाव्याच्या दुकानात कारागीर आहेत . परिस्थितीवर मात करून ज्या मुलांना शिकायची इच्छा आहे , अशी मुले येथे शिकायला येतात. या मुलांच्या कडून ,शिकविण्याची फी घेतली जात नाही. मोफत शिक्षण दिले जाते. शिकविणारे शिक्षक, कोणतेही मानधन घेत नाहीत. सर्वजण स्वयंस्फूर्तिने येतात आणि शिकवतात .
हा अनोखा क्लास ,नाशकातील गंगापूर रोडवर असलेल्या सावरकर नगर मधील ,विश्वास लाॅन्सचे मालक श्री. विश्वास ठाकूर ,ज्या बिल्डिंग मध्ये राहतात, त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये किंवा अजूबाजूच्या मोकळ्या जागेतील ,झाडाखाली चालतो. थंडी व पावसाळ्यात, तो विश्वास लाॅन्सच्या इमारतीत ही चालतो. या क्लासला फी नसल्याने ,जागेचे भाडे कुठून देणार ? श्री. विश्वासजी ठाकूर, आपल्या जागेचा उपयोग, या कामासाठी मोफत करून देतात.
सौ. मेहता मॅडम यांनी, बारा वर्षा पूर्वी हा उपक्रम सुरू केला व त्यात सातत्य राखले , ही बाब अभिनंदनीय आहेच ! क्लास मधील सर्व वर्गातली मुले ,त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करतात.
आम्ही सावरकर नगरमध्ये रहायला आल्यावर ,आमच्या घराच्या बाल्कनीतून, मला हे वर्ग दिसायचे. कांही मुलं बसली आहेत व कोणीतरी त्यांना शिकवतं आहे . हे दृष्य पाहून, माझ्या मनात उत्कंठा निर्माण झाली. मी चौकशी केल्यावर, मला सौ. मेहता मॅडम यांचे नाव समजले, मी त्यांना भेटलो . या उपक्रमाची माहीती घेतली. मला उपक्रम आवडला. मी या उपक्रमात, सामिल होण्याची इच्छा प्रकट केली. त्या वेळी आठवीच्या वर्गाला शिकवायला, कोणी नव्हते. मी, ती जबाबदारी आनंदाने स्विकारली.
आज मी अत्यंत तृप्त आहे. निरपेक्ष वृत्तीने केलेल्या कामाचा ,आगळा वेगळा आनंद लुटत आहे. माझ्या क्लास मध्ये वीस ते पस्तीस मुले असतात . मुले जमीनीवर बसतात. मी शिक्षक या नात्याने , पार्किंच्या छोट्याशा कट्यावर बसतो. शेजारी खांबाला टेकवून, एक छोटा फळा असतो. माझ्या क्लास मधील मुलांच्यात रममाण होउन , त्यांच्या सुखदुःखात सहभागी होउन , शिकविण्याचा आगळा वेगळा निरपेक्ष आनंद, मी घेतो आहे.
मी रोज उपस्थित मुलांची ,हजरी घेतो. हजरीच्या वेळी ,मी प्रत्येक मुलांला, एक बोधवाक्य म्हणायला लावतो. सलग पंधरा दिवसा नंतर मी वाक्य बदलून , दुसरे वाक्य देतो. मुले हजरीच्या वेळी, ते बोधवाक्य मला म्हणून दाखवितात. ही वाक्ये साधारण अशी असतात.
१.तोच तोच विषय, परत परत करणे, म्हणजे अभ्यास , विषयात बदल, हीच विश्रांती. २. जो अभ्यास करतो, तोच माझा मित्र. जो अभ्यास करत नाही, तो माझा मित्र नाही. ३. माझे आई वडील कष्ट करून मला शिकवतात , मी भरपूर अभ्यास करीन व आई वडीलांना सुखात ठेवीन. ४. मी पैसे मिळवायला लागल्यावर , दर महिन्याला किमान २५ % पैसे शिल्लक टाकीन. ५, मी पैसे मिळवायला लागल्यावर , रोजचा जमाखर्च डायरीत लिहील्या शिवाय ,झोपणार नाही. इत्यादी.....
मी संध्याकाळी क्लासमध्ये गेलो की ,मुलं मला " गुड इव्हिनिंग सर " असे म्हणायची . क्लास संपल्यावर " गुड नाईट सर " म्हणायची. मी ते बंद केले. त्या ऐवजी दोन्ही वेळी " जय हिंद "म्हणा ,असे मी सांगीतले, आता मुले मी गेलो की किंवा क्लास सुटल्यावर, " जय हिन्द , सर " असे न विसरता म्हणतात,
महिन्याच्या शेवटी ,ज्या विद्यार्थ्याची १०० % हजेरी असेल ,त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थीनीला, मी बक्षिस देतो. पॅड , कंपास किंवा इतर कांही शैक्षणिक साहित्य , त्या त्या विद्यार्थ्याला विचारून , त्याची गरज लक्षात घेउन, विकत आणून देतो. मुले खूष होतात . क्लासला १०० % हजेरी असावी ,असा प्रयत्न करतात.
या वर्षीच्या माझ्या वाढदिवसा निमित्त मी, माझ्या क्लास मधील सर्व विद्यार्थी , विद्यार्थिनींना " डिक्शनरी " भेट दिली.
अशा प्रकारे रोज संध्याकाळी, सहा ते साडेसात या वेळेत, अतिशय आनंदात, मी या उपक्रमाचा ,निरपेक्ष आनंद मिळवत आहे. या आनंदाची, इतर कोणत्या ही आनंदाशी, तुलना होउच शकत नाही.
सौ. सुधा मेहता यांनी ,मला या उपक्रमात सहभागी करून घेतल्या बद्दल ,त्यांना शतशः धन्यवाद !

No comments:
Post a Comment