एके दिवशी संध्याकाळी ,नाशिकच्या काॅलेज रोड वरील ,श्रध्दा माॅल मध्ये, तरूणाईला आवडणार्या गाण्याचा आवाज आला व पाऊले तिकडे वळली. हे गाणं शास्त्रिय संगीत नाही , हिन्दी सिने संगीत ही नाही , हे समजत होते. हे कांही तरी वेगळेच संगीत आहे , आपण पूर्वी कधी ही, असले लाऊड संगीत ऐकलेले नाही ,हे समजून सुध्दा, मी तिकडे खेचला गेलो. गाणं मला कळत नव्हतं , पण हे तरूणाईला भावणारं आहे हे समजत होतं, जाणवत होतं.
आत गेलो तर पाच पंन्नास तरूण , तरूणी त्या गायका भोवती उभे राहून, गाण्याचा आस्वाद घेत होते. माहोल एकदम चिअरफुल्ल होता. स्पिकर्स फुल्ल व्हाॅल्युम वर असावेत , आवाजाचा घुमारा म्हणजे " बास " , छान ठेवला होता ,कोण गात होता माहिती नाही , काय गात होता ते गाणंही माहिती नाही , फक्त दिसत होतं की ती तरूणाई, ते सर्व एंजाॅय करतेय.
मला तरूणाईची अशी एंजाॅयमेंट ,नेहमीच आवडते. तो गायक गाण्याची ओळ, मधूनच अर्धवट सोडत होता , समोरची तरूणाई कोरस मध्ये, ती ओळ पूर्ण करत होती. थोडक्यात गाणार्याची व ऐकणार्यांची वेव्ह लेंग्थ जमली होती.
खूप आनंद वाटला ,तो माहौल पाहून व ऐकून ! आपण ही तरूण झाल्या सारखं वाटलं ! आयुष्यात असे योग ,फार थोडे येतात. एकूण " दिल खुष हो गया बाॅस " !
लै भारी.....

No comments:
Post a Comment