फोटोत तुम्हाला एक रूबाबदार व्यक्ती दिसत आहे , ते म्हणजे आमच्या नाशिक मधील सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील श्री. यशवंत जोशी ! पण आम्ही त्यांना " रामभाउ " म्हणतो. त्यांचे टोपण नाव " राम " असेल ,असा आमचा खूप दिवस समज होता.
परवा नाशिक मधील लोकल " मटा " मध्ये ,त्यांच्या मुलीने एक लेख लिहीला होता . तो वाचून, आम्हाला मोठा साक्षात्कारच झाला. लग्ना पूर्वी ,काॅलेजात एकत्र शिकत असताना, " यशवंत जोशी " आणि " रोहिणी बापट " यांनी " रामलिला " या नाटकात, राम आणि सीता यांची कामे केली होती. नाटकात शेवटी रामसीतेचे लग्न झाले आणि नाटक संपले. पण यांच्या दोघांच्या जीवनातील खरे " नाट्य ", त्या नंतर सुरू झाले. या खर्या खुर्या नाटकाची परिणती ,त्या दोघांच्या विवाहाने झाली . त्या नंतर यशवंत जोशी यांना त्यांची खास मित्र मंडळी, " राम " म्हणूनच संबोधू लागली आणि आमचे " रामभाउ " अस्तित्वात आले. नाटकातील लग्न प्रत्यक्षात आल्यानं चि. सौ. कां. रोहिणी बापट या " सौ. सुहास जोशी " झाल्या. अशा प्रकारे स्टेजवरची " रामलिला " ,जोश्यांच्या घरी प्रत्यक्षात अवतरली.
आमच्या रामभाउंचे भारदस्त व्यक्तीमत्व पाहता ,ते मिलिट्रितून " जनरल किंवा तत्सम उच्च " पदा वरून सेवा निवृत्त झालेले असावेत किंवा पोलिस दलातून उच्च पदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले असावेत, असा कयास कोणी ही बांधू शकेल. भरदार शरीर यष्टी , भक्कम उंची , गोरापान सतेज रंग आणि त्याला शोभणार्या अक्कडबाज मिशा ! रामभाउंचे हे रूप पाहून ,ते जाॅन्सन अॅंड जाॅन्सन या मल्टि नॅशनल कंपनीतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झाले असावेत ,हे कोणाला ही खरे वाटणार नाही. पण वस्तूस्थिती तीच आहे. रामभाउंच्या औषधशास्त्रातील प्रचंड ज्ञाना मुळे ,सेवा निवृत्त होउन बरीच वर्षे झाली तरी ,जाॅन्सन अॅंड जाॅन्सन या कंपनीत नवीन भरती झालेल्या किंवा रिफ्रेशर्स कोर्स मध्ये " व्याख्यान " देण्यासाठी, त्यांना मोठ्या सन्मानाने आज ही निमंत्रित केले जाते.
रामभाउंच्या कडे त्यांची नातवंडे आली की ,त्यांचा उत्साह ओसंडून वहात असतो. नातवंडांना घेउन ते पांडव लेणी , चामर लेणी ( चांभार लेणी ) , रामशेज किल्ला अशा ठिकाणी ट्रेकिंग करतात. कधी कधी गरज असेल तर नातवंडाला खांद्यावर बसवून, ते अवघड चढ चढून जातात. त्यांच्या या उत्साहाचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे .
प्रत्येक २६ जानेवारीलाआणि १५ आॅगस्टला ,रामभाउंच्या बंगल्या समोर आपल्या जवळच्या लोकांना बोलावून ,ते साग्रसंगीत " झेंडावंदन " करतात. त्या दिवशी झेंडा वंदनाला येणार्या सर्वांना, भरपेट " गुळाचा शिरा " ते आग्रहाने खाउ घालतात.
त्यांच्या पत्नी सौ. सुहास, या अतिशय उत्तम चित्रकार आहेत. चित्रकलेच्या वेगळ्या वेगळ्या शैलींचा त्यांचा अभ्यास, थक्क करणारा आहे. त्यांच्या ड्राॅइंग क्लास मधील विद्यार्थी, निरनिराळ्या स्पर्धा परिक्षात, अत्यंत उच्च दर्जाचे यश संपादन करतात.
रामभाउंच्या सासूबाईंना ,शेगावच्या गजानन महाराजांची " गजानन विजय " ही पोथी मुखोद्गत आहे. रामभाउंची एक कन्या ,उत्तम आर्किटेक्ट आहे. दुसरी पुण्याला असते. आमच्या रामभाउंचे कुटूंब, अतिशय कलासक्त आणि सात्विक आहे. त्यांना व त्यांच्या घरातील सर्वांना, मना पासून प्रणाम करतो आणि थांबतो !
जय श्रीराम !

No comments:
Post a Comment