आमच्या नाशिक मधील सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,श्री. मुकूंदराव खाडिलकर मूळचे सांगलीचे ! पण आता नाशिककर झालेले ! त्यांचा व माझा चालण्याचा स्पीड जुळतो. तसेच सांगली मिरजच्या आठवणी हा आमचा समान दुवा असल्याने , आम्ही कृषी नगर जाॅगिंग ट्रॅकवर एकत्र फिरतो.
मुकूंदराव सेवानिवृत्त आहेत. त्यांची सर्व नोकरी नाशिकमधील बाॅश , सॅमसोनाइट इत्यादी मल्टीनॅशनल कंपनीत झालेली आहे. तिथे ते बर्याच उच्च पदावर कार्यरत असल्याने, त्यांच्या बर्याच ओळखी आहेत. श्री. मुकूंदरांच्या ओळखीतली माणसे, ट्रॅकवर फिरताना त्यांच्या समोर आली की मोठ्या अदबीने ,त्यांना नमस्कार करतात. आमच्या सांगली मिरजेच्या माणसाला, नाशकातले लोक आदराने नमस्कार करतात , हे पाहून माझाच ऊर अभिमानाने भरून येतो.
श्री. मुकूंदराव म्हणजे एक देखणे व्यक्तीमत्व आहे. गोरापान रंग , निळसर डोळे , भव्य कपाळ , तगडी उंची , शरीर अंगाबरोबर , थोडक्यात पाहता क्षणी यांच्याशी ओळख करून घेतलीच पाहिजे , असे वाटणारे देखणे व्यक्तीमत्व !
श्री. मुकूंदरावांना वावगं अजिबात खपत नाही. ते तिथल्या तिथे सांगून ,त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या संस्कृती बद्दल त्यांना खूप अभिमान आहे. देवादिकांची खिल्ली उडविणारे विनोद ,त्यांना पसंत नसतात. तसेच ते मोदी भक्त ही आहेत.
त्यांनी विविध विषयांचे वाचन आणि मनन केले आहे. नोकरीत असताना कारण परत्वे ,ते भरपूर देश व विदेश फिरले आहेत. सेवानिवृत्ती नंतर सुध्दा, देश विदेशात भरपूर पर्यटन केले आहे. त्या मुळे त्यांच्या आचारात आणि विचारात एक प्रकारचा प्रगल्भपणा निश्चितच जाणवतो. त्यांना साहित्या बरोबरच संगीताचीही आवड आहे. साहित्य संगीताशी संबंधीत एखादा चांगला कार्यक्रम, नाशकात असला की , श्री. मुकूंदराव आणि सौ. वहिनी तेथे निश्चित हजर असतात ! सौ. वासंती वहिनी सुध्दा, मुकूंदरावांच्याच प्रमाणे साहित्य आणि संगीताच्या रसिक आहेत. त्या उत्तम सतार वाजवितात.
श्री. मुकूंदरावांना सामाजिक जाणीव आहे. नाशकातल्या श्रीगुरूजी रूग्णालयाचे ते उपाध्यक्ष आहेत. दिवसाचा ठराविक वेळ ते या रूग्णालयासाठी देतात . त्यांची ही निरपेक्ष सेवा आहे.
श्री. मुकूंदरावांना आणि सौ. वहिनींना नातेवाईक भरपूर आहेत. सर्व नातेवाईकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी ते आवर्जून हजर राहतात व आपली कर्तव्ये बिनचूक पार पाडतात.
असे हे आमच्या ग्रुपचा आधारस्तंभ असलेले श्री. मुकूंदराव, सध्या आपल्या लेकीकडे अमेरिकेत गेलेले आहेत. त्यांच्या येण्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पहात आहेत.
श्री. मुकूंदरावांना आणि सौ. वासंती वहिनींना निरामय आयुष्यासाठी ,भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment