फोटोत दिसत आहेत ते, आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,आदरणीय डाॅ. श्री. नवनीतभाई गुजराथी सर ! त्यांना सर म्हणायचे कारण म्हणजे, ते नाशिकच्या सुप्रसिध्द आर. वाय. के. काॅलेज मध्ये, एम्. एस्सी. चे प्राध्यापक होते. ते फिजिकल केमिस्ट्री चे डाॅक्टरेट आहेत . ते नुसते प्राध्यापक नव्हते , तर आपल्या विषयाच्या ज्ञानाचा उपयोग करून, त्यांनी नाशिकच्या उद्योजकांचे , आयुर्वेदिक डाॅक्टरांचे, केमिस्ट्री या विषयाशी संबंधित प्रश्न ,स्वतःच्या खासगी प्रयोग शाळेत, स्वतंत्र रित्या प्रयोग करून ,सोडविले आहेत.
सर्वसाधारणपणे, प्राध्यापक आपला विषय उत्तमात उत्तम शिकविण्याकडे ,नक्कीच लक्ष पुरवतात. पण आपल्या विषयाचा , ज्ञानाचा ,समाजाला उपयोग व्हावा, या बाबीकडे फार थोडे प्राध्यापक, लक्ष पुरवतात. डाॅ. गुजराथी सर, सामाजिक जाण असलेले प्राध्यापक आहेत. त्यांनी नोकरीत असताना, प्राध्यापकांचे प्रश्न ,अत्यंत हिरीरिने काॅलेजच्या मॅनेजमेंट समोर आणि पुणे विद्यापीठात , स्पष्ट शब्दात मांडलेले होते. त्यांच्या वेळच्या प्राध्यापकांचे ,ते लढवया नेते होते . सामाजिक जाणिवे सोबत, नेतृत्वाचे गूण त्यांनी जोपासले होते.
त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांच्या घराण्यात शिकलेले ,ते पहिलेच ! आपल्या मामांच्या पासून प्रेरणा घेउन ,ते शिकले . ते ही डाॅक्टरेट लेव्हल पर्यंत ! त्यांनी ज्या काळी डाॅक्टरेट केली , त्या काळातले त्यांचे अनुभव ,त्यांनी केलेले कष्ट ,ते कधी कधी सांगतात. त्या वरून त्या काळी डाॅक्टरेट करणे, किती कठीण होते, त्याची कल्पना येते.
श्री, गुजराथी सरांचे, आणखीन एक वैशिष्ठ्य आहे. त्यांना ट्रेकिंगची जबरदस्त आवड होती . नाशिकच्या काॅलेज विद्यार्थ्यात, ट्रेकिंगची आवड, त्यांनी त्या काळी, निर्माण केली .त्या काळी ट्रेकिंगचे शास्त्र ,आजच्या एवढे प्रगत नव्हते. हिमालयात ट्रेकिंगसाठी त्यानी विद्यार्थ्यांची बॅच त्या काळी नेली होती. महाराष्ट्राचे अत्त्युच्च शिखर कळसूबाई , गुजराथी सरांनी पंधरा वेळेला सर केले आहे.
विज्ञान निष्ठ असलेले डाॅ. गुजराथी सर " मराठी विज्ञान परिषदेचे " एके काळचे अध्यक्ष होते. आज ही त्यांना त्या परिषदे बद्दल जिव्हाळा आणि आस्था आहे. नुकताच " मराठी विज्ञान परिषदेने " त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा जाहीर सन्मान केला होता.
डाॅ. गुजराथी सर रोज बिनचूक आमच्या बरोबर फिरायला असतात, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्यांच्या बरोबर विविध विषयावर चर्चा करताना , त्यांचा माहितीचा प्रचंड खजिना पाहून डोळे दिपून जातात.
डाॅ. गुजराथींचे आजचे वय आहे ८७ वर्षे ! वयाच्या मानाने तब्बेत उत्तमच आहे.
डाॅ. गुजराथींना तीन मुले. मोठा मुलगा नाशिक मध्येच एका मोठ्या हाॅस्पिटल मध्ये " जनरल सर्जन " आहे. मधला मुलगा अभियंता आहे. तो ही एका खासगी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहे. सर्वात धाकटी मुलगी , ती ही " गायनॅकोलाॅजीस्ट " डाॅक्टर आहे. थोडक्यात सरांची तिन ही मुले उच्च विद्या विभूषित आहेत. सरांना सौ. भाभींची समर्थ साथ आहेच !
डाॅ. नवनीतभाई गुजराथींना आणि सौ. भाभींना , परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment