खाली फोटोत दिसत आहेत ते मिरजेचे प्रसिध्द " धन्वंतरी " डाॅ. वसंतराव करमरकर. मी धन्वंतरी म्हटल्याने ते आयुर्वेदिक वैद्य असतील असा तुमचा समज होण्याची शक्यता आहे. परंतू ते MD ( Chest ) आहेत. मिरजेच्या करमरकर घराण्यात वैद्यकीय व्यवसाय हा पिढ्यांपिढ्या चालत असलेला व्यवसाय असल्याने डाॅ. वसंतराव करमरकरांचा आयुर्वेदिक औषधांचा ही खूप अभ्यास आहे. अॅलोपॅथी आणि आयुर्वेद अशा दोन्ही पॅथींचा अभ्यास असणारे डाॅक्टर फार थोडे आहेत. त्यात डाॅ. वसंतरावांचा नंबर खूप वरचा आहे.
डाॅ. वसंतराव हे पेशंट मधला माणूस जपणारे आणि जाणणारे दुर्मिळ डाॅक्टर आहेत. त्यांच्याकडे गेल्यास किमान तास , दीड तास तुम्हाला रांगेत थांबावेच लागते. बाहेर किती ही मोठी रांग असली तरी वसंतराव त्यांच्या समोर असलेल्या पेशंटचे त्याच्या आजारा संबधी संपूर्ण समाधान झाल्या शिवाय बाहेर पाठवत नाहीत. सर्व साधारणपणे बाहेर किती पेशंट आहेत त्याचा अंदाज घेउन , प्रत्येक पेशंटला किती वेळ द्यायचा याचे गणित डाॅक्टरांनी मनोमन मांडलेले असते. पेशंटचे समाधान होण्या विषयी त्यांना कांहीही कर्तव्य नसते. पण डाॅ. वसंतराव हे असे डाॅक्टर मुळीच नाहीत. त्यांची व्यवसाया प्रती असलेली निष्ठा आणि रूग्ण सेवा हीच ईश्वरसेवा मानण्याचा त्यांचा ठामपणा , यातून पेशंट आणि डाॅक्टर यांच्यात एक प्रेमाचा बंध तयार होतो , तो बंध फार फार महत्वाचा ठरतो.
माझ्या मिसेसला सौ. रजनीला छातीत दुखण्याचा त्रास होता. डाॅ. करमरकरांनी तिला हा त्रास ह्रदय विकाराशी संबंधीत मुळीच नाही असे अनेक वेळ्ळा सांगीतले. शेवटी तिच्या समाधानासाठी अॅंजिओग्राफी करायचे ठरले. मी डाॅ. वसंतरावांना अशी विनंती केली कीं , तुम्ही जिथे आत हजर राहू शकत असाल , अशा जागीच मला सौ. रजनीवर अॅंजिओग्राफी व्हावी असे वाटते. कोल्हापूरला तशी सोय उपलब्ध होती. त्या दिवशी सकाळची मिरजेतील आपली OPD बंद ठेउन डाॅ. वसंतराव कोल्हापूरला खास आमच्यासाठी आले होते. अॅंजिओग्राफीचा रिपोर्ट संपूर्णपणे निगेटिव्ह होता. शेवटी ते छातीचे दुखणे डाव्या बाजूच्या रिब जाॅइंटशी संबंधित आहे , हा डाॅ. वसंतरावांचा कोणत्याही चांचण्या न करता स्वानुभवावर काढलेला निष्कर्ष १०० % खरा निघाला. माझी मुलगी , मुलगा , वडील , आई यांच्या आजारपणात व अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात त्यांनी आम्हाला सुयोग्य मार्गदर्शन केल्याने , मिरजेत असताना डाॅ. वसंतरावांच्या मुळे आम्हाला सुरक्षित वाटायचे.
नंतर आम्ही नाशिकला आल्यावर इथे डाॅ. वसंतराव नाहीत , म्हणून आम्हाला सुरवातीच्या काळात असुरक्षित वाटायचे. पण काळाच्या ओघात आता आम्ही वैद्य अभय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली, नाशिकमध्ये ही अॅडजस्ट झालोय.
डाॅ. वसंतरावांच्या मिसेस म्हणजे डाॅ. सौ. विनिता वहीनी ! त्या मराठी विषयाच्या Ph. D. आहेत. मराठी सिनेमा आणि रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट कै. चित्तरंजन कोल्हटकर यांच्या त्या कन्या होत.
डाॅ. वसंतराव करमरकर यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघेही वैद्यकीय व्यवसायाशी निगडीतच आहेत. डाॅ. वसंतरावांना चार नातवंडे आहेत. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहे.
डाॅ. वसंतरावांचे वय सत्तरीच्या आसपास आहे. डाॅक्टरांना वयोपरत्वे कधी कधी व्यवसाय कमी करावा असे वाटते. पण त्यांच्यावर विश्वास आणि श्रध्दा असणारे पेशंटस् त्यांना अजिबात सोडत नाहीत. त्यांचा दवाखाना कायम फुल्ल असतो.
काल धनत्रयोदशी होती. त्या निमित्त त्यांच्या दवाखान्यात धन्वंतरी पूजन होते. त्या वेळी डाॅक्टरांचा काढलेला प्रसन्न फोटो......

No comments:
Post a Comment