" मुघल ए आझम " , १९६० सालचा एक भव्यदिव्य चित्रपट ! ज्यात शहेनशहा अकबराची भूमिका ,पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. पृथ्वीराज म्हणजे राज कपूरचे पिताश्री ! अकबराला, राजपूत पत्नी जोधाबाई, हिच्या पासून झालेला मुलगा, म्हणजे सलीम ! त्याची भूमिका केली होती दिलीप कुमार यांनी ! त्याची प्रेयसी, म्हणजे अकबराच्या दरबारातील नृत्यांगना अनारकली , ही भूमिका मधुबालाने केलेली होती. भव्य सेट्स व जबरदस्त अभिनय या मुळे, हा सिनेमा त्या काळी फार गाजला होता.
अशा गाजलेल्या सिनेमावर नाटक बेतणे, ही संकल्पना, मनाला फारशी पटणारी नाही. सिनेमात दाखविता येणारी भव्यता ,रंगमंचावर कशी दिसणार ? शिवाय तितक्या तोडीचे अभिनेते कसे मिळणार ? असे अनेक प्रश्न, हे नाटक पाहण्या पूर्वी ,कोणाच्या ही मनात येउ शकतात. तसे माझ्या ही मनात होते. शिवाय नाटकाचे तिकीट प्रति व्यक्ती रू. २५०० /- होते. नाटक मुंबईत NCPA ला होते. नाशिकहून नाटकासाठी मुंबईला जाणे ,केवळ अशक्यच ! पण तो योग आला व मी ते नाटक पाहिले.
नाटक पाहून आल्यावर ,मन अतिशय आनंदित झाले होते . रंगमंचा वरचा तो प्रयोग, केवळ अविस्मरणीय असाच होता . NCPA थिएटरही भव्य दिव्य व या प्रयोगाला साजेसेच होते. या नाटकाचे प्रयोग, फक्त मुंबई व दिल्ली येथे झाले आहेत. गेले वर्षभर झालेले सर्व प्रयोग, " हाउस फुल्ल " होते असे समजले.
या नाटकात स्टेजवर ,मुघल ए आझम या चित्रपटातील गाणी पाहणे ,हा एक आनंद योगच होता. उदाहराणार्थ सांगायचे तर ," प्यार किया तो डरना क्या " हे गाणे ,अनालकली व तिच्या अंदाजे पंचवीस ते तीस सख्या ,यांनी अतिशय सुंदर सादर केले . खरच डोळ्याचे पारणे फिटले ! हे हिन्दी नाटक ऐतिहासिक व मुघल राजघराण्यावर आधारित असल्याने, सर्वांची वेषभूषा, अतिशय देखणी व झगमगाटपूर्ण अशीच होती. स्टेजवर दाखविलेला, शहेनशहा अकबर व सलीम यांचा युध्दाचा प्रसंग ,अजोड असाच होता. नेपथ्यात ही वेगळेपणा होता. त्याला सिनेमाच्या तंत्राची जोड दिल्याने, स्टेजवर हुबेहुब त्रिमितीय भास निर्माण होत होता . भव्यता डोळ्यात भरत होती.
या नाटकात अनारकलीची भूमिका, मराठी अभिनेत्री प्रियांका बर्वे, हिने केली आहे. तिचा आवाज व नृत्य कौशल्य लाजवाबच ! एकूण हे नाटक पाहिल्यावर, आता रंगमंचावर पुन्हा कांहीही पाहिले नाही तरी चालेल , असा एक भव्यदिव्य आणि सुखद अनुभव, या नाटकाने दिला.
ज्यांनी हे नाटक पाहिले किंवा पुढे पाहतील, ते माझ्या या मताशी निश्चित सहमत होतीलच, असा विश्वास बाळगून थांबतो !

No comments:
Post a Comment