आज मी माझ्या अतिशय जवळच्या मित्राची ओळख करून देणार आहे. त्याचे नाव आहे श्री. अरविंद बाळासाहेब वर्हाडे . आम्ही सर्व मित्र त्याला " राजा " या नावानेच हाक मारतो. राजा हा मनाने खरोखरच " राजा माणूस " आहे.
माझ्या " मेरी , नाशिक " मधील नोकरीच्या काळातल्या जास्तीत जास्त शासकीय कामासाठी कराव्या
लागणार्या " टूर्स " राजा बरोबर केलेल्या आहेत. टूरचं प्लॅनिंग , टूरच्या खर्चाचे नियोजन हे सर्व राजा अत्यंत समर्थपणे सांभाळत असे. तो विज्ञानाचा पदवीधर असला तरी त्याचे अकाउंटिंग अतिशय चांगले आहे. हे त्याचे खास वैशिष्ठ्य आहे. तोंडी हिशोब तर तो इतके पटापट करतो की , संगणक ही त्याचा स्पिड पाहून चकित होईल ! आमच्या " वैज्ञानिक " लोकांची एक " आर्थिक सोसायटी " होती. त्याचे आर्थिक व्यवहार राजा अगदी चोखपणे सांभाळायचा . कधी ही एका पैशाचा घोटाळा त्याच्या कार्यकालात झाला नाही. सचोटी आणि प्रामाणिकपणा या राजाच्या गुणांना सलाम !
राजा " मेरी काॅलनी "च्या क्वार्टर मध्ये रहायचा. आम्ही क्वार्टरमध्ये राहणारे लोक जेवायच्या सुट्टीत घरी जात असू. पण राजा एकदा आॅफीसला गेला की आॅफीस सुटल्या नंतरच घरी येत असे. मधल्या जेवायच्या सुट्टीच्या वेळात मेरी कॅन्टीनमध्ये " काड्यापेटी " चे विविध खेळ खेळून टाईमपास करणार्या ग्रुपमध्ये तो सामिल व्हायचा.
मेरीमध्ये वैज्ञानिक असलेल्या लोकांना अभियंते दुय्यम वागणूक द्यायचे. प्रमोशन्सपण कमी असायची , त्या मुळे आमच्या सर्वांच्या मनात एक प्रकारचे वैषम्य असायचे. राजा जेंव्हा रिटायर झाला , त्या वेळी त्याला मोठा " सेंडआॅफ " देण्यात आला. स्टेजवर मेरीतील मान्यवर बसलेले होते. त्या वेळी राजाने निरोपाचे भाषण करताना या वैषम्याला सर्वांच्या वतीने वाचा फोडली. तो म्हणाला " आम्हा वैज्ञानिकांच्यावर शासनाने बराच अन्याय केलेला आहे , पण परमेश्वराच्या दरबारात न्याय असल्याने , त्याने या अन्यायाची भरपाई केलेली आहे. आमची सर्वांची मुले उत्तम शिकून आपल्या आपापल्याल्या क्षेत्रात नाव कमवित आहेत. "
राजाचे हे बोल त्याच्या मुलांनी सार्थ ठरविले आहेत. त्याचा मोठा मुलगा अभियंता आहे , दुसरा मुलगा डाॅक्टर आहे आणि तिसरा काॅमर्स ग्रॅज्युएट अाहे. राजाची तीन ही मुले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी आहेत. हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे.
खाली फोटोत श्री. व सौ. वर्हाडे दिसत आहेत. इतके उत्तम आणि त्याच बरोबर खर्चिक अभ्यासक्रम मुलांनी करायचे म्हणजे आर्थिक नियोजन जबरदस्त हवेच ! राजाला सौ. वहिनींची सुयोग्य साथ असल्यानेच हे सर्व शक्य झाले आहे.
उत्तम नियोजन असल्याने स्वतःच्या कर्तृत्वाने
राजा आज " स्वतःच्या बंगल्यात " शांत आयुष्य व्यतित करत आहे.
अशा या माझ्या कर्तृत्ववान मित्राला उत्तम निरामय आणि उदंड आयुष्य लाभो , हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment