नाशिक मधील " मेरी " ( M.E.R.I.) ही संस्था बहुतेक नाशिककरांना ऐकून माहिती असते. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यात , नोकरी केलेल्यांना , ही संस्था नक्कीच माहिती असते. इतर ठिकाणी काम करणार्या स्थापत्य अभियंत्यांना (Civil Engineers) ही संस्था माहिती असू शकते. " मेरी " ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याची संशोधन संस्था आहे. अशा या नावाजलेल्या संस्थेत, माझी नोकरी होणे, ही भाग्याची गोष्ट आहे , असे मी समजतो.
तसा विचार करायला गेले तर प्रत्येक संस्थेचा भाग्याचा , उत्कर्षाचा एक विशिष्ठ सुवर्ण काळ असतो. मेरी या संस्थेचा सुवर्णकाळ म्हणजे तिथे श्री.पां कृ. नगरकर साहेब, मुख्य अभियंता व संचालक म्हणून कार्यरत असलेला काळ असे निर्विवादपणे सांगता येईल.
त्यांच्या काळात या संस्थेत ११ विभाग कार्यरत होते. सर्व विभागात मूलभूत ( Basic ) आणि उपयोजित ((Applied )संशोधनाची कामे चालत. प्रत्येक कामावर मा. श्री. नगरकर साहेबांचा ठसा असे. दर महिन्याला ते प्रत्येक विभागाला त्या त्या विभागाची संशोधनाची प्रगती जाणून घेण्यासाठी भेट देत असत. त्यांच्या काळात प्रामाणिकपणे संशोधन करणार्यांना, त्यांचा मुक्त पाठिंबा असे. त्यांच्या काळात मेरीतून , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या व प्रसिध्द झालेल्या संशोधन प्रबंधांची संख्या आणि त्यांना मिळालेल्या पारितोषकांची संख्या , संस्थेच्या इतिहासात नक्कीच सर्वात जास्त असेल अशी माझी खात्री आहे.
संस्थेला सुसज्ज ग्रंथालय आहे. मा.श्री. नगरकर साहेबांच्या काळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संशोधन संस्थांचे रिपोर्टस् , मासिके व उत्तम उत्तम तांत्रिक विषयांची पुस्तके ग्रंथालयात येत असत. त्या सर्वावर त्यांची नजर असे. कोणत्या विभागाने कोणत्या पुस्तकातील कोणत्या टाॅपिकचा अभ्यास करावा या संबंधी सूचक टिपणे त्यांनी त्या त्या पुस्तकावर लिहीलेली असत. साहेबांचा वाचनाचा स्पिड जबरदस्त होता. सर्वसाधारणपणे सामान्य वाचकास १०० पानांचा तांत्रिक अहवाल वाचण्यास जेवढा कालावधी लागतो त्याच्या १/४ कालावधीत बारकाईने वाचन व निरीक्षण करून साहेबांनी तो वाचून संपविलेला असायचा. वाचताना त्यात कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत त्यांची नोंद ही त्यांनी केलेली असायची.
मेरी सभोवती वर्ग १ ते वर्ग ४ अशा अधिकारी व कर्मचार्यांची शासकीय निवासस्धाने आहेत. त्या परिसराला " मेरी काॅलनी " असे म्हणत असत. या संपूर्ण मेरी काॅलनीवर साहेबांचे बारीक लक्ष असे. साहेब आॅफिसात किंवा काॅलनीतून निघालेले असले की अजूबाजूचे लोक आदराने बाजूला सरकून त्यांना मानाने वाट करून देत असत.
माझ्या आठवणी प्रमाणे आदरणीय श्री. नगरकर साहेब १९८७ साली सेवा निवृत्त झाले व पुण्याला आपल्या घरी रहायला गेले.
मी नुकताच त्यांना भेटण्यासाठी पुण्यात त्यांच्या घरी गेलो होतो. आज साहेबांचे वय अंदाजे ८९ असावे. साहेब आज ही पूर्वी इतकेच सतेज आणि प्रसन्न आहेत. सध्या ते संस्कृत भाषेचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या घरी त्यांची खूप मोठी व सुसज्ज लायब्ररी आहे. मी गेलो असताना साहेबांनी त्यांची ती लायब्ररी मला दाखवली. त्यातील कोणत्या ग्रंथात काय मजकूर आहे , हे ही त्यांनी सांगीतले. या वयात त्यांचा अभ्यास व स्मरणशक्ती दोन्ही ही पाहून मी आश्चर्याने थक्कच झालो.
साहेबांच्या पत्नी म्हणजे आम्हा सर्वांच्या " नगरकर काकू " आज हयात नाहीत. पण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा ठसा आमच्या सर्वांच्या ह्रदयात कायमचा कोरलेला आहे. मेरी काॅलनीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा खूप मोठा सहभाग असायचा. आपण एका उच्चपदस्थ अधिकार्याची पत्नी आहोत , असा अभिनिवेश त्यांनी कधीच बाळगला नाही. चांगल्या कामाला त्यांचा ही सतत पाठिंबा असे.
साहेबांना दोन मुले व एक मुलगी. सर्वजण आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत व सर्वजण साहेबांची मना पासून काळजी घेत आहेत.
आदरणीय श्री. नगरकर साहेबांना उदंड व निरामय आयुष्य लाभो , ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment