आज नाशकातील आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, श्री. आर. डी. जोशी ( व्याही जोशी ) यांना ८१ वर्षे पूर्ण झाली. त्या बद्दल चहापानाचा कार्यक्रम ,त्यांनी आमच्या नेहमीच्या, हाॅटेल " कृृृृृष्ण विजय " मध्ये ,अरेंज केला होता.
श्री. जोशी ,हे खरं तर आमच्याच ग्रुप मधील, श्री. केसकर सरांचे व्याही ! केसकर सरांच्या मुलीचे ते सासरे आहेत. आम्ही सर्वजण त्यांना " व्याही " या नावानेच संबोधतो. अशा प्रकारे ते आमच्या ग्रुपचे " व्याही " झालेले आहेत.
श्री. जोशीं, नाशिक जवळील ओझर येथील, " एच. ए. एल. " या मिग विमानांच्या फॅक्टरी मधून , सेवानिवृृृृृृत्त झालेले आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यात ,एक प्रकारचा काटेकोरपणा आणि स्वयंशिस्त आहे. त्यांची तब्बेत वयोमानाचा विचार करता चांगलीच आहे. ते स्वभावाने तसे अलिप्त आहेत . आपल्या सोयीने ते कृषीनगर जाॅगिंग ट्रॅकवर येतात. आपल्याला जमेल तेवढा व्यायाम ,ट्रॅकवर उपलब्ध साधनांच्या सहाय्याने करतात . सूर्योदय झाला की , ट्रॅकच्या एका कोपर्यात उभे राहून, हात जोडून , सूर्याला मनोमन वंदन करून ,कांही मिनीटे शांत उभे राहतात . त्या नंतर ट्रॅकवर स्वतःला झेपेल तितकेच फिरून, मग सर्वांच्या गप्पात सामील होतात. ते बोलतात कमी, पण जे बोलतील ,ते अतिशय मार्मिक असते.
श्री. जोशी ,गुरूदेव रानडे यांचे अनुग्रहित आहेत. वर्षातून एकदा तरी " निंबाळ " ला जाण्याचा ,त्यांचा प्रघात आहे.
अशा एक सात्विक व्यक्तीमत्वाच्या श्री. जोशींना, आमच्या सर्व ग्रुप तर्फे ,वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा ! त्यांचे पुढील आयुष्य निरामय , सुखाचे आणि समाधानाचे जावो , हीच सदिच्छा !

No comments:
Post a Comment