फोटोत दिसत आहेत ते आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील ,एक सळसळते उत्साही व्यक्तीमत्व ,श्री. एस. डी. कुलकर्णी , सेवानिवृत्त प्राचार्य , एच. पी. टी. काॅलेज ,नाशिक.
आमच्या ग्रुपमध्ये वयानं दोन नंबरचे ज्येष्ठ. एक नंबरला आहेत डाॅ. गुजराथी सर , त्यांचे वय आहे ८४. एस. डी. के. सरांचं वय आहे ८२. पण त्यांच्या अंगातील सळसळता उत्साह पाहून ,त्यांचे वय २८ वाटते. ८२ व्या वर्षी ही ते अतिशय फास्ट चालतात. १० मिनीटाला १ किमी.
आमच्या ग्रुप मधील कोणाचा ही वाढदिवस असो , सर त्यांच्या साठी स्वतःच्या बागेतील फुलांचा पुष्पगुच्छ बनवून आणतात व ज्याचा वाढदिवस आहे ,त्याचे गुणवर्णन करणारी स्वरचित कविता ही लिहून आणतात . त्यांची काव्य प्रतिभा या वयातही अतिशय सतेज आहे , ही दुर्मिळ गोष्ट आहे. सर्वसाधारण पणे ८२ व्या वर्षी माणूस, शारीरिक व्याधीने जर्जर व निरिच्छ बनतो. पण सरांना म्हणावी अशी कोणतीही व्याधी नाही व ते निरिच्छ अजिबात नाहीत. कोणत्या ही गोष्टीचा मनमोकळा आस्वाद कसा घ्यावा, ते सरांच्या कडून शिकावे. आमच्या ग्रुपमध्ये "नर्म विनोद " करावेत ते केवळ सरांनीच ! त्यांच्या विनोदांनी सकाळच्या प्रहरी आमचा " निरामय जाॅगर्स ग्रुप " खळाळून हसतो. ग्रुपमधील कोणाकडून चहा कसा काढायचा ,ते सरांच्या कडूनच शिकावे. " आज तुम्ही फार स्मार्ट दिसताय ", असे सर कोणाला म्हणाले की ओळखावे ,आज त्या व्यक्तीला सर सगळ्या ग्रुपला चहा पाजायला लावणार ! एवढेच कशाला, कुणी फिरायचे नवीन बूट खरेदी केले तर, डाव्या पायातील बुटाचा चहा आज व उजव्या पायातील बुटाचा चहा उद्या ,सरांनी मॅनेज केलाच म्हणून समजा. ते फक्त दुसर्या कडून चहा काढतात असे नव्हे ,तर तेवढ्याच मुक्तपणे मना पासून, ते स्वतः ही चहा द्यायला तेवढेच तयार असतात. सरांचा वीक पाॅईंट म्हणजे " सुगंध " ! छान दरवळणारा सुगंध सरांना मना पासून प्रिय आहे.
असे हे आमचे सर्वांचे प्रीय "सर " ,आता मुलाकडे मुंबईला रहायला जाणार आहेत. त्यांचा अॅबसेन्स आम्हाला सर्वांनाच जाणवणार आहे. त्यांचा अॅबसेन्स आमच्या पैकी प्रत्येकालाच अतिशय कठीण जाणार आहे. सरांचे नर्म विनोद , त्यांच्या मुळे मिळणारा चहा , चहा घेता घेता रंगणारी गप्पाष्टके , सरांच्या वाढदिवसाच्या कविता , सरांचा आनंदी सहवास आता दुर्मिळ होणार, म्हणून आम्ही सर्वजण अत्यंत व्यथित आहोत.
सर आपल्या मुलाकडे रहायला निघालेत , हे काळा प्रमाणे योग्यच आहे. पण सुप्रभाती मिळणार्या त्यांच्या प्रसन्न व आनंददायी सहवासाला आम्ही सर्वजण मुकणार , याचे वैषम्य वाटते.
सरांना व सौ. वहीनींना भरपूर आणि निरामय आयुष्य लाभो हीच परमेश्वरा जवळ मना पासून प्रार्थना !
( एक वाईट बातमी ...श्री. एस. डी. कुलकर्णी सरांचे ,मुंबई येथे दि. २९ जुलै २०२० रोजी निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो , हीच प्रार्थना ! )
" कालाय तस्मै नमः । "

आम्ही जातो अमुच्या गावा , अमुचा राम राम घ्यावा !
No comments:
Post a Comment