आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ते म्हणजे मेरी तील एक अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तीमत्व ,श्री. म.वि. कुलकर्णी उर्फ आम्हा सगळ्यांचे MVK.
MVK , विज्ञान पदवीधर आहेत. घरच्या नाजूक आर्थिक परिस्थिती मुळे , MVK अभियंता होउ शकले नाहीत. ते जर अभियंता झाले असते तर , स्वतःच्या ज्ञानावर आणि कर्तृृृृत्वावर ते नक्की ,महाराष्ट्र राज्यात पाटबंधारे खात्यात ,किमान मुख्य अभियंता नक्की झाले असते, असा मला विश्वास आहे. ते जरी अभियंता होउ शकले नाहीत तरी , त्यांच्या बुध्दीमत्तापूर्ण अभ्यासाने, ते त्यांच्या मृृृृृृद यांत्रिकी ,( Soil Mechanics ) या अभियांत्रिकी विषयाचे " महामहोपाध्याय " म्हणजेच " संपूर्ण ज्ञानी " आहेत , असे माझे स्पष्ट मत आहे.
" मेरी " संशोधन संस्थेत , MVK , मृद यांत्रिकी विभागात वैज्ञानिक अधिकारी ,या पदावर कार्यरत होते. संस्थेतील अतिशय अभ्यासू म्हणून, ते प्रसिध्द होते. ते स्वतः भरपूर काम करत , तसेच हाता खालच्या लोकांच्या कडून ,आपल्याला आवश्यक ते काम करून घेण्याचे प्रशासकीय कसब , त्यांच्या कडे नक्कीच होते. ते जरी सायन्स ग्रॅज्युएट असले तरी , त्यांचे वाचन , निरीक्षण आणि मनन उत्तम असल्याने , अभियंता असलेले वरिष्ठ अधिकारी , त्यांना मानाने वागवत असत.
MVK यांचा व आमचा ,कौटूंबिक संबंध आजतागायत कायम आहे. आम्ही एकमेकांच्या कौंटूंबिक सुख दुःखाच्या प्रसंगात, नेहमी बरोबर असतो. आमचा एकमेकांना ,सर्व प्रकारचा आधार होता व आज ही आहे.
MVK यांना तीन मुले ! मुलगी चि. सौ. रोहिणी पुराणिक ही औरंगाबादला असते. तिने गांधर्व महाविद्यालयाची संवादिनी वादनाची संगीताची सर्वोच्य पदवी प्राप्त केली आहे. ती संवादिनी वादन शिकवते ही ! मोठा मुलगा चि. मिलींद ,हा अभियंता आहे. तो " सीमेन्स " कंपनीत, उच्च पदस्थ अधिकारी आहे. दोन नंबरचा मुलगा चि. शिरीष ,हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम अधिकारात कार्यरत आहे. सर्वजण आपल्या आपल्या जागी ,सुस्थित आहेत.
MVK यांना सौ. वहिनींची समर्थ साथ आहेच !

श्री. MVK यांनी , मृृृृृद यांत्रिकी (Soil Mechanics ) या अभियांत्रिकी विषयाचे " Quality Control Hand Book" लिहीले आहे. महाराष्ट्र शासनाने त्या पुस्तकाला ,अधिकृृृृृृृत रीत्या मान्यता देउन , प्रसिध्द केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे , Soil Mechanics या विषयाच्या Quality Control ची , "भगवद गीता" च आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मी कांही वर्षे Quality Control ला ,साईटवर काम केल्याने ,त्या पुस्तकाचे महत्व मला चांगलेच ज्ञात आहे.MVK , नुसते शासकीय कामातच फक्त रस घेतात असे नाही. मेरी काॅलनीतील सांस्कृृृृतिक सोहळ्यात, त्यांचा आणि त्यांच्या कुटूंबाचा, प्रत्यक्ष सहभाग असे. मेरीच्या सांस्कृृृृृृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, गणेशोत्सवात नाटके सादर केली जात असत. त्यात त्यांचा उत्साहाने सहभाग असे. कलेला आणि कलाकारांना उत्तेजन देणे , ही त्या मागची प्रेरणा होती.
MVK यांचा व आमचा ,कौटूंबिक संबंध आजतागायत कायम आहे. आम्ही एकमेकांच्या कौंटूंबिक सुख दुःखाच्या प्रसंगात, नेहमी बरोबर असतो. आमचा एकमेकांना ,सर्व प्रकारचा आधार होता व आज ही आहे.
MVK यांना तीन मुले ! मुलगी चि. सौ. रोहिणी पुराणिक ही औरंगाबादला असते. तिने गांधर्व महाविद्यालयाची संवादिनी वादनाची संगीताची सर्वोच्य पदवी प्राप्त केली आहे. ती संवादिनी वादन शिकवते ही ! मोठा मुलगा चि. मिलींद ,हा अभियंता आहे. तो " सीमेन्स " कंपनीत, उच्च पदस्थ अधिकारी आहे. दोन नंबरचा मुलगा चि. शिरीष ,हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम अधिकारात कार्यरत आहे. सर्वजण आपल्या आपल्या जागी ,सुस्थित आहेत.
MVK यांना सौ. वहिनींची समर्थ साथ आहेच !
सध्या MVK यांचे वय , ८० च्या पुढे आहे. पण वयाच्या मानाने , त्यांची तब्बेत उत्तम आहे. आमचा अनेक वर्षांचा घरोबा असल्याने , त्यांना आवर्जून भेटावेसे वाटते. त्यांच्या घरी गेले की , सर्वजण आगत्याने स्वागत करतात.
अशा आदरणीय व्यक्तीमत्वाच्या, श्री. MVK आणि सौ. वहिनींना, परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे , अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
No comments:
Post a Comment