फोटोत दिसत आहेत ते ,आमच्या नाशिकच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील श्री. ठाकूर साहेब ! उंची भरपूर , शरीरयष्टी एकदम राजस , बोलका चेहरा , नेहमी टापटिपीने केलेला इन शर्ट , असे एकदम भारदस्त, उत्साही व्यक्तीमत्व म्हणजे श्री. ठाकूर साहेब !
कोणत्याही सेलेब्रेशन साठी सदैव तय्यार ! ग्रुपमधील कुणाचा वाढदिवस असो , कुणाच्या लग्नाचा वाढदिवस असो , आणखी कांही कारणाने आनंद साजरा करायचा असो , श्री. ठाकूर साहेब त्या सर्वात उत्साहाने सतत पुढे असतात. दुसर्याच्या आनंदात मुक्तपणे कोणताही आडपडदा न ठेवता " झोकून " कसे सामील व्हावे ते श्री. ठाकूर यांचे कडूनच शिकावे !
श्री. ठाकूर साहेब स्टेट बॅंक आॅफ इंडिया मधून ,उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. बर्याच ठिकाणी कामा निमित्त बदल्या झाल्याने , मनुष्य स्वभावाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्या मुळे विविध किस्से त्यांच्या कडून ऐकणे , हा आमच्या सर्वांच्यासाठी एक हास्य सोहळाच असतो. ते कृषिनगर जाॅगिंग ट्रॅकवर फिरायला सर्वात आधी, म्हणजे पहाटे साडेपांच ते पावणे सहा वाजता येतात आणि सर्वात शेवटी ,गप्पा मारायला बसतात. त्यांचा चालण्याचा स्पिड ही जबरदस्त आहे. आमच्या ग्रुप मधील कोणी ही, त्यांना काॅम्पिट करू शकत नाही. त्यांच्या बरोबर फिरणारे त्यांचे दोस्त वेगळेच आहेत. आम्ही सर्वजण सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी, फिरून झाल्यावर गप्पाटप्पा करून, घरी जायला निघतो. पण श्री. ठाकूर त्या नंतर , ट्रॅक वरच्याच दुसर्या एका " हास्य क्लब " मध्ये सामील होतात. थोडक्यात ते कोणत्याही एका ग्रुपमध्ये, अडकून पडत नाहीत. ज्या वेळी जो ग्रुप असेल त्यात सामावून जाणे , ही मोठी दुर्मिळ गोष्ट श्री. ठाकूर साहेबांना , सहज जमते ! हे त्यांचे खास असे स्वभाव वैशिष्ठ्यच आहे.
त्यांचे घरी त्यांच्या पत्नी , मुलगा , सून , नातवंड असे सगळे एकत्र राहतात. आजच्या काळात " एकत्र कुटूंब असणे " फार कमी पहायला मिळते. पण श्री. ठाकूर साहेबांनी आणि त्यांच्या कुटूंबाने , हे आवर्जून जपले आहे. हे दुर्मिळ आहे.
असे सदाबहार व्यक्तीमत्वाचे व समोर असेल त्या ग्रुप मध्ये ,स्वतःला " झोकून देउन " मिसळू शकणारे श्री. ठाकूर साहेब ,आमच्या ग्रुपचे एक वैशिष्ठ्यपूर्ण घटक आहेत , याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. श्री. ठाकूर साहेबांना उदंड आणि निरामय आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment