फोटोत दिसत आहेत , ते म्हणजे आमच्या नाशिकच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, श्री. शिवाजीराव वाटपाडे. आमच्या ग्रुप मधील एकमेव पणजोबा ! आम्ही बहुतेक सर्वजण अजोबा आहोतच ! पण आमच्या ग्रुप मधील एकमेव पणजोबा, फक्त तेच आहेत . वाटपाडे म्हणजे शांत व्यक्तीमत्व . उगीच कोणत्या ही वादात ते सहसा पडणार नाहीत.
ते महाराष्ट्र शासनाच्या भूमापनाशी संबंधीत खात्यातून ,सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या खात्यातील कामाची संपूर्ण माहिती त्यांना असल्याने , नाशकातले नावाजलेले वकील ,भूमापना संबंधी कांही शंका असल्यास ,आज ही त्यांची मदत घेत असतात. त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व बारीक सारीक गोष्टी किंवा भूमापनातले बारकावे, त्यांना आज ही लक्षात आहेत. आज त्यांचे वय ७५ वर्षे आहे , पण स्मरणशक्तीने त्यांना दगा दिलेला नाही.
त्यांचे लहानपण ,अतिशय कष्टात गेलेले आहे. पण सर्व परिस्थितीवर मात करून, त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले . फक्त स्वतःचेच केले असे नव्हे ,तर आपल्या लहान भावंडांचे शिक्षणासाठी ,त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. संसारात ही त्यांना परमेश्वराने पुत्र वियोगाचा धक्का देउन ,घायाळ केले आहे . त्या धक्क्याचे वर्णन ऐकून, हे या गृहस्थाने कसे सहन केले असतील ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो . पण आजच्या घडीला, ते शांतपणे आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या पत्नीची त्यांना उत्तम साथ आहे. त्यांची सून आणि नातवंडे, त्यांची मना पासून काळजी घेत आहेत. ही भाग्याची गोष्ट आहे.
ते परमपूज्य पांडूरंग शास्त्री आठवले यांच्या
" स्वाध्याय परिवारा " शी संबंधित आहेत. त्या परिवाराशी संबंधित विचार, त्यांनी आत्मसात केल्याने, श्री. शिवाजीराव मनाने खरे खरे शांत आहेत. आमच्या ग्रुप मधील अध्यात्मिक विचाराने चालणारे व तसे वागणारे ,ते एकमेव व्यक्ती आहेत. टिव्हीवर सुध्दा ते कौटूंबिक किंवा इतर सिरीयल्स न पाहता , आस्था किंवा संस्कार चॅनेलवरील प्रवचने , तन्मयतेने ऐकतात.

अशा अत्यंत सत्शील अशा श्री. शिवाजीराव वाटपाडे यांना ,उदंड आणि निरामय ,सुख समाधान युक्त आयुष्य लाभो, हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना ! त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो !
No comments:
Post a Comment