अाज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ,त्यांचे नाव आहे, वेदमूर्ति ( कै. ) दत्तात्रय वेणीमाधव जोशी उर्फ " काशिकर गुरूजी " यांची !
ते जरी मिरजेत स्थायीक झालेले असले, तरी ते मुळचे काशीचे असल्याने ,त्यांना मिरजकर मंडळी " काशिकर गुरूजी " या नावाने ओळखत असत. आज काशिकर गुरूजी हयात नाहीत , पण त्यांच्या आठवणीने माझ्या सारख्या अनेकांच्या मनाचा एक हळवा कोपरा, व्यापलेला आहे.
सन १९६२ मध्ये ,कांही घरगुती वादा मुळे काशिकर गुरूजींनी काशीतील आपले घर सोडले आणि ते मिरजेत आले. मिरजेत ब्राह्मणपुरीत विद्या मदिर प्रशालेचे मुख्याध्यापक, श्री. तात्यासाहेब साठये रहात होते. त्यांच्या पत्नी सौ. लिलाताई साठये, या काशिकर गुरूजींच्या मावस बहिण होत्या. काशिकर गुरूजी मिरजेत आल्यावर, श्री. तात्या साठये यांनी त्यांच्यासाठी गोरे मंगल कार्यालयाचे मालक, श्री. चिंतामणी गोरे यांच्याकडे शब्द टाकला. काशिकर गुरूजींना वेदविद्ये बरोबरच पौरोहित्य ही येत असल्याने, श्री. चिंतामणी गोरे यांनी त्यांना, आपल्या कार्यालयात पौरोहित्य करण्यासाठी ठेउन घेतले. श्री. गोरेंना एका विश्वासू सहाय्यकाची आवश्यकता होती. अशा प्रकारे ,काशिकर गुरूजी काशीहून मिरजेत आले आणि कायमचे " मिरजकर "च झाले.
ते श्री. गोरेंच्या बरोबरीने ,पौरोहित्य करू लागले. तसेच गोरे मंगल कार्यालयात ,पडेल ते काम करून ,त्यांनी आपली उपयुक्तता सिध्द केली. श्री. गोरेंनी त्यांच्या प्रामाणिकपणाची ,एकदोनदा परीक्षा केली. त्यात ते उत्तीर्ण झाले. अनेकदा श्री. गोरे ,काशिकर गुरूजींना " अमुक तमुक यांचे पौरोहित्य करून या " असे सांगत. काशिकर गुरूजी जाउन ,ते पौरोहित्याचे काम चोखपणे पार पाडत. तिथे जी दक्षिणा मिळे, ती स्वतः कडे न ठेवता श्री. गोरे यांचे हाती देत. श्री. गोरे म्हणत , " तुम्ही हे काम केले आहे , दक्षिणेवर तुमचा हक्क आहे " . गुरूजी त्यांना म्हणत , " हे पौरोहित्याचे काम तुम्ही मला दिलेले आहे ,त्या मुळे मिळणार्या दक्षिणेवर तुमचा अधिकार आहे ". केवढा हा प्रामाणिकपणा ! सर्वसाधारणपणे लोक इतर बाबतीत, प्रामाणिकपणा दाखवतात. पण पैशाचा विषय आला की, त्यांचा स्वार्थ जागा होतो. पण काशिकर गुरूजी या स्वार्था पासून ,अलिप्त होते.
एकदा दुसर्या एका त्याच व्यवसायातील व्यक्तीने, गुरूजींना आपल्याकडे खेचण्यासाठी , सोन्याची घसघशीत अंगठी देउ केली. या किमती वस्तूच्या दबावा मुळे ,काशिकर गुरूजी आपल्याकडे येतील ,असा त्यांचा होरा होता . पण प्रामाणिकपणाचा " दीपस्तंभ " असलेल्या गुरूजींनी, ती अंगठी आणून श्री. गोरे यांना दिली . स्वतःकडे ठेवली नाही. हा त्यांचा प्रामाणिकपणा पाहून, श्री. गोरे संतुष्ट झाले . त्यांनी त्यांना आपल्या घरचा मानून ,आपल्या घरातच ठेउन घेतले.
एव्हाना गुरूजी अविवाहित होते. योग्य वेळी श्री. गोरेंनी कार्यालयात काम करणार्या, एका सुयोग्य मुलीशी स्वतः पुढाकार घेउन, त्यांचा विवाह करून दिला. तसेच आपल्या घरातच, त्या दोघांची ही रहायची व्यवस्था करून दिली. त्या दोघांना आणि त्यांच्या तीन मुलांना, श्री. चिंतामणी गोरे आणि त्यांच्या कुटूंबियांनी भरभरून प्रेम दिले.
एव्हाना गुरूजींना मिरजेत, बर्यापैकी लोक ओळखू लागले होते. पौरोहित्य करण्याच्या निमित्ताने ते अनेकांच्या घरी जात. तिथे त्यांच्या शिस्तबध्द आणि आपुलकीच्या वागण्याने, त्यांनी अनेक कुटूंबे आपलीशी केली. आमचे दीक्षित कुटूंबिय ही ,त्या पैकीच एक होते. गुरूजी अगदी रोज आमच्या घरी येत व मनसोक्त गप्पा मारत. ते एखाद्या दिवशी आले नाहीत तर, आम्हा सर्वांना चुकल्या चुकल्या सारखे होत असे.
गुरूजींना वेद विद्येचे ज्ञान असल्याने ,मी त्यांना त्या बाबतीतल्या शंका विचारत असे. वेदांचे पद , क्रम , जटा , घन म्हणजे काय ? घनपाठी वैदिक म्हणजे काय ? किंवा " प्रस्थानत्रयी " म्हणजे काय ? गुरूजींना वेदविद्येचे सखोल ज्ञान असल्याने, त्यांनी माझ्या या सर्व शंकांचे निरसन केले होते. काशिकर गुरूजींनी मला व माझे स्नेही श्री. चंदू लेले यांना ," रूद्र आणि शिवमहिम्न " म्हणायला शिकविले आहे.
गोरे मंगल कार्यालयात, त्र५ग्वेद संहिता स्वहाकार होत असे. त्या वेळी गुरूजींचा उत्साह वाखाणण्या सारखा असे. सात दिवस भरगच्च कार्यक्रम असत. स्वतः श्री. गोरे व त्यांचे चिरंजीव श्री. विनोद, यांच्या बरोबरीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, गुरूजी धावपळ करीत असत.
त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली की ते, ती उत्तमरीत्या पार पाडत असत. कोणत्या ही प्रकारच्या कष्टाला ,ते मागे हटत नसत. तसेच कोणती ही गोष्ट, ठरलेल्या वेळेवर झालीच पाहिजे ,असा त्यांचा कटाक्ष असे. गुरूजींना कमी झोप पुरत असे. रात्री किती ही वाजता झोपले ,तरी पहाटे साडेतीनला म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर ते उठत व त्यांचा दिवस सुरू होत असे. कधी कधी मोकळे असले की, गुरूजी त्यांच्या आयुष्यातले आणि मंगल कार्यालयातले एक एक किस्से, रंगवून रंगवून सांगायचे . ऐकणारा सुध्दा त्यात रंगून गेलाच पाहिजे, अशी त्यांची हातोटी होती.
वयोपरत्वे, गुरूजींना कांही कांही शारीरिक व्याधी सुरू झाल्या. कांही लहान मोठी आॅपरेशन्स ही करावी लागली. अखंड व्यस्त असणारे गुरूजी सन २००९ मध्ये ,वयाच्या ७२ व्या वर्षी " स्वर्गवासी " झाले.
गुरूजींना तीन मुले. मुलीचे लग्न होउन, ती बेळगावला स्थिरस्थावर आहे. दोन्ही मुले विवाहित असून, मिरजेत स्वतंत्रपणे रहात आहेत. त्यांचे ही त्यांच्या परीने ,उत्तम चालले आहे. त्यांच्या पत्नी ,आपल्या मुलांच्या समवेत कालक्रमणा करीत आहेत.
कै. काशिकर गुरूजी आज जरी आपल्यात नसले ,तरी त्यांचे स्थान आम्हा दीक्षित कुटूंबियांच्या ह्रदयात ,चिरंतन राहील. या लेखाचे माध्यमातून प्रामाणिक , कष्टाळू , " वेदमूर्ति काशिकर गुरूजीं "ना , मनोमन श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment