आज मी तुम्हाला माझा वर्गमित्र, कै. प्रा. डाॅ. लालासाहेब निवृत्ती घोरपडे,याची ओळख करून देणार आहे.त्याच्या नावा मागे ( कै.) लिहीणं ,मनाला अत्यंत वेदनादायी आहे.
आमचा हा मित्र उत्साहाचा झरा होता. सिटी हायस्कूल , सांगली ,मधील शाळेतल्या मित्रांचा आमचा एक " व्हाॅट्स अॅप " ग्रुप आहे. त्यात रोज सकाळी लालासाहेब विविध वनस्पती , फुले , पाने यांची शास्त्रिय माहिती, फोटो सह पाठवायचा. त्या मुळे आमची सकाळ ,अतिशय प्रसन्न असायची.
आमचे वर्ग मित्रांचे दोन स्नेहमेळावे झाले. दोन्हीत तो उत्साहाने सामिल झाला होता. तिथे त्याने अतिशय कमी वेळात , विविध प्रकारची मन मोहक पुष्परचना ,आम्हाला करून दाखविली. त्याच्या वनस्पती सृष्टीच्या ज्ञाना बरोबरच, त्याच्या सौंदर्य दृष्टीचे, आम्हाला सर्वांना अतिशय कौतूक वाटले होते.
आमच्या या मित्राचे मूळ गाव सातवे ( ता. पन्हाळा , जि. कोल्हापूर ). तिथेच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. दहावी आणि अकरावी अशी दोन वर्षे, तो आमच्या वर्गात सिटी हायस्कूल ,सांगली ,येथे होता. नंतर त्याने शिवाजी युनिव्हर्सिटीतून वनस्पतीशास्त्रात, एम. एस्सी. आणि " उसावर पडणारे रोग " या संदर्भात, आपली " डाॅक्टरेट " पूर्ण केली. त्याच्या या संशोधन प्रबंधाला, आंतर राष्ट्रीय मान्यता देणारी
" प्रशस्तीपत्रके ", मिळालेली आहेत. तो डाॅक्टरेट करीत असताना, त्याला तांत्रिक आणि प्रशासकीय, अशा अनंत अडचणींचा सामना करावा लागला . पण त्याने जिद्दीने आपली डाॅक्टरेट पूर्ण केली. त्याच्या त्या जिद्दीला त्रिवार
वंदन !
एम. एस्सी. झाल्या नंतर ,तो ज्या काॅलेज मधून ग्रॅज्युएट झाला, त्या वारणानगर काॅलेज मध्ये तो प्रथम डेमाॅन्स्ट्रेटर या पदावर ,हजर झाला. आपल्या गुणवत्तेच्या आणि शिकविण्याच्या कौशल्याच्या जोरावर , तो तिथेच प्राध्यापक ही झाला. त्याची शिकविण्याची हातोटी अतिशय चांगली असल्याने ,त्याचे विद्यार्थी आज ही त्याची मना पासून ,आठवण काढतात .
हे सगळं सुरळीत चालू असताना १९९८ साली, त्याच्या पत्नी कॅन्सरने " गेल्या ". हा त्याला मोठा मानसीक धक्का होता. त्यातून सावरायला त्याला खूप वेळ लागला. दुसरा विवाह करण्या विषयी नातेवाईकांच्या कडून, दबाव येत होता. पण त्याने आपल्या मुलांचा विचार करून तो विषय, निग्रहाने बाजूस सारला.
सन २००५ मध्ये, तो काॅलेजच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाला. सेवानिवृत्ती नंतर " वारणा कोडोली ज्येष्ठ नागरीक संघ " या सेवाभावी संस्थेच्या कामाला, त्याने वाहून घेतले. त्या नागरीक संघातर्फे अनेक सामाजोपयोगी उपक्रम ,त्याने पार पाडले. नागरीक संघाला स्वतःची इमारत नव्हती. ती बांधून मिळण्यासाठी, त्याने शासन दरबारी तसेच आमदार खासदारांना भेटून, ते काम पूर्णत्वास नेले. वारणानगर मधील मुलांच्यासाठी " चिल्ड्रेन पार्क " व्हावा ,या साठी त्याने विशेष प्रयत्न केले. हा प्रकल्प " कोल्हापूर रोटरी क्लब " मार्फत त्याने पूर्ण केला . वारणानगर ज्येष्ठ नागरीक संघाचे वरिष्ठ पद स्विकारण्या विषयी ,त्याला आग्रह झाला. पण त्याने विनम्रपणे कोणते ही पद स्विकारण्यास, नकार दिला. पद आणि पैसा मिळविण्यासाठी ,आजकाल सर्वजण आसुसलेले असतात , अशा वेळी लालासाहेबाचा हा निर्णय, त्याच्या निरपेक्ष मनाची साक्ष देतो.
लालासाहेब यास बागेत विविध रोपे लावून , त्यांची प्रेमाने निगा राखण्याची ,विशेष आवड होती. बोनसाय तयार करण्याचे विशिष्ठ तंत्र, त्याने आत्मसात केलेले होते. विविध मनोहारी पुष्परचना करणे, हा त्याचा छंद होता. त्याने आपल्या बागेत ,कमळाची फुले फुलावीत या साठी खूप प्रयत्न केले. ती फुललेली कमल पुष्पे ,कै. लालासाहेब याची वाट पहात आहेत, असे रोज त्याच्या मुलांना वाटते व त्यांचे मन हेलावते.
लालासाहेब याला दोन मुले व एक मुलगी. तीन ही मुले उच्च शिक्षित असून, आपल्या आपल्या क्षेत्रात ,कर्तृत्व सिध्द करीत आहेत.
झाडे , फळे आणि फुले यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणार्या आमच्या मित्राला शेवटी कॅन्सरने गाठले. त्याच्या मुलांनी त्याची सेवा करण्यात आणि उपचारात ,कोणती ही कसर सोडली नाही. पण काळापुढे ,कुणाचे कांही चालले नाही आणि आमचा हा जिवलग मित्र, दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी ,काळाच्या पडद्या आड निघून " गेला ".
या लेखाच्या माध्यमातून, कै.प्रा. डाॅ. लालासाहेब निवृत्ती घोरपडे, या आमच्या मित्राला, साश्रुपूर्ण नयनांनी श्रध्दांजली अर्पण करतो आणि थांबतो.
।। ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।

No comments:
Post a Comment