अभियंता , संशोधक ,अभिनेता आणि बॅंकर असा विविधांगी प्रवास असलेला, माझा एक मित्र आहे. मी आज तुम्हाला त्याची ओळख करून देणार आहे. त्याचे नाव आहे श्री. प्रकाश विश्वनाथ क्षीरसागर ! असे विविधांगी व्यक्तीमत्व असणारा प्रकाश, आमचा मित्र आहे ही आम्हा मित्रांना ,अभिमानास्पद गोष्ट आहे .
श्री. प्रकाश क्षीरसागर ,पुण्यातून अभियंता झाला आणि नाशिकच्या " मेरी " या महाराष्ट्र राज्याच्या, पाटबंधारे खात्याच्या संशोधन संस्थेत, वैज्ञानिक पदावर हजर झाला. तेथील महामार्ग संशोधन विभागात त्याने, पाच वर्षे संशोधनाचे काम केले. काम करताना ते नीट समजावून घेउन अभ्यासपूर्ण करण्याचा, त्याचा स्वभाव असल्याने ,वरिष्ठांची त्याच्यावर मर्जी असायची. पाच वर्षांचा बाॅन्ड पूर्ण होताच , त्याने ती नोकरी सोडली. नंतर कुवैत या देशात, तिथल्या रिफायनरींशी संबंधित " वाॅटर कूलींग प्रकल्पावर, " क्वालिटी कंट्रोल अभियंता म्हणून त्याने नोकरी स्विकारली . तिथे त्याने चार वर्षे, उत्तम प्रकारे काम केले. पण तिथले हवामान आणि एकटे राहण्याने होणारे खाण्या जेवण्याचे हाल , यांचा विचार करून त्याने ती नोकरी सोडली .त्या नंतर मुंबईत भाभा अणू संशोधन केंद्रात, प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी कंट्रोल अभियंता, अशा दोन्ही जबाबदार्या त्याने उत्तम प्रकारे पार पाडल्या. पण कांही कौटूंबिक अडचणी मुळे, त्याला ही नोकरी वर्षभरातच सोडावी लागली आणि श्री. प्रकाशच्या आयुष्याला, एक वेगळे वळण मिळाले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत, तो अधिकारी पदावर हजर झाला. तिथे बॅक जी कर्जे देत असे, त्यांची तांत्रिक छाननी करण्याचे काम ,त्याच्या कडे होते. तसेच त्याने नाशिक जिल्ह्यातील कांही तालूक्या मधील , द्राक्षे व कांदा उत्पादक शेतकर्यांच्या विकासासाठी, फलोत्पादन योजने अंतर्गत, त्या काळी ५० कोटी रूपयांच्या मागणीचा अभ्यासपूर्ण अहवाल , नाबार्डला सादर केला. तो मंजूर झाला आणि प्रकाशच्या बॅंकिंगच्या कामाला गती मिळाली. नंतर त्याने " बॅलन्स शीट अॅनॅलॅसिस " इत्यादी महत्वाच्या बाबींचा स्वतः अभ्यास करून, बॅंकिंगच्या परीक्षा दिल्या व तो अभियंता होताच , आता " बॅंकर " सुध्दा झाला. ही श्री. प्रकाशची फार मोठी उपलब्धी आहे ,असे मला वाटते. १९८४ ते २००५ अशी २१ वर्षे ,त्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत ,उत्तम प्रकारे काम केले. त्याच्या तडफदार कामा मुळे , नाशिकच्या बॅंकिंग क्षेत्रात ,एव्हाना त्याच्या नावाचा दबदबा तयार झाला होता.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतून सेवानिवृत्त झाल्या झाल्या लगेच, गोदावरी सहकारी बॅंक आणि त्या नंतर देवळा मर्चंट्स सहकारी बॅंक, येथे कांही काळ त्याने सेवा दिली .
आता तो गेली आठ वर्षे, राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी बॅंकेत " मुख्य कार्यकारी अधिकारी " या उच्च पदावर, कार्यरत आहे. या आठ वर्षात, त्याने बॅंकेच्या ठेवी १०० कोटी वरून, ४२० कोटी रूपयांवर नेल्या आहेत. बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांना शिस्त लावून, बॅंकेच्या हेड आॅफिस व्यतिरिक्त चार नवीन शाखा उघडल्या आहेत. पंधरा हजार तीनशे सभासद असलेली ही बॅंक, अतिशय शिस्तबद्धपणे श्री. प्रकाश क्षीरसागरने , उर्जितावस्थेला आणलेली आहे. ही बॅंक नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात ,सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकावर आहे , ही अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे.
श्री. प्रकाशने जिथे जिथे काम केले, तिथल्या अधिकारी , कर्मचारी आणि ग्राहक यांच्या मानसिकतेचा, मानसशास्त्राच्या विशिष्ठ दृष्टीकोनातून अभ्यास केल्याने, तो सर्वत्र यशस्वी झाला आहे.
" मेरी " या संशोधन संस्थेत असताना, श्री. प्रकाश आणि त्याच्या पत्नी सौ. रेखा वहिनी, यांनी तिथल्या गणेशोत्सवातील विविध नाटकात कामे करून, आपल्या अभिनयाचे दर्शन ,रसिकांना घडविले आहे.
श्री. प्रकाश याला तीन मुले. दोन मुली आणि एक मुलगा. सर्वजण उच्च शिक्षित असून, आपापल्या जागी सुव्यवस्थित आहेत. श्री. प्रकाशला , सौ. रेखा वहिनींची समर्थ साथ आहेच !
अशा या बहुरंगी व्यक्तीमत्व असलेल्या व जिथे जाईल तिथे स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेल्या, माझ्या मित्राला आणि सौ. वहीनींना पुढील निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment