आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ,त्यांचे नाव आहे ,श्री. गोविंद उर्फ चंद्रकांत उर्फ चंदू लेले ! श्री. चंदू, हे माझ्या पेक्षा वयाने, लहान आहेत . " बालादपि सुभाषितम् ग्राह्यम् " असे एक संस्कृत वचन आहे .त्याचा अर्थ, " लहानांच्या चांगल्या गोष्टी ऐकून आत्मसात कराव्यात ". या न्यायाने श्री. चंदू यांच्या कडून, मला ही, खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व विशाल आहे , अनुकरणीय आहे.
श्री. चंदू ,हे मातृपितृ भक्त आहेत. आता त्यांचे आई आणि वडील, दोघे ही हयात नाहीत. पण त्यांनी त्या दोघांचा शब्द कधी ही, खाली पडू दिला नाही. त्यांनी दोघांची सेवा , मना पासून केली. कारणे कांही का असेनात, पण हे आज काल दुर्मिळ आहे.
श्री. चंदू तन ,मन, धनाने धार्मिक आहेत. ते दर पौर्णिमेला, मिरजेहून नृसिंहवाडीला चालत जातात. केवळ दत्त महाराजांच्या दर्शनासाठी ! तसेच त्यांच्या शेतावर ,अधून मधून भजनाचा कार्यक्रम असतो. त्या भजनी मंडळींना आणि श्रोतृवृन्दाला, नंतर उत्तम भोजनाचा आस्वाद दिला जातो. त्यांना व सौ. गायत्री वहिनींना, अन्नदान करायला फार आवडते. आपल्या शेतावर त्यांनी ,मोठ्या प्रेमाने, गो धनाचे संगोपन केलेले आहे. तसेच ते " शिव प्रतिष्ठानच्या " श्री. संभाजीराव भिडे यांचे ," धारकरी " आहेत.
श्री. चंदू , सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून, M.E. ( Stucture ) प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत. M.E . झाल्या नंतर, त्यांनी कांही वर्षे शासकीय नोकरी केली. पण कुणाच्या हाता खाली काम करण्याचा, त्यांचा पिंड नसल्याने, त्यांनी शासकीय नोकरी सोडली व स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय मिरज , सांगली भागात सुरू केला.
तो उत्तम प्रकारे चालला. सर्व साधारणपणे उत्तम चाललेला व्यवसाय, आपल्या पुढच्या पिढीच्या ताब्यात देण्याची कल्पना, कुणाच्या ही मनाला शिवत नाही. व्यवसायाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातातून जातील , आपले महत्व कमी होईल , असा अहंकार त्या मागे असतो. पण ज्यांना व्यर्थ अहंकारच नाही ,अशा श्री. चंदू यांनी, स्वतःच्या वयाच्या ५४ व्या वर्षी, स्थापत्य अभियंता झालेल्या आपल्या मुलाला ,आपल्या व्यवसायाची धुरा सोपवली आणि वयाच्या ५६ व्या वर्षी ,व्यवसायातून पूर्णपणे अंग काढून घेतले. व्यवसायातील सत्तेचा मोह , पैशाचा मोह , अहंमन्यतेचा मोह ,वयाच्या ५४ व्या वर्षी सोडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे ,श्री. चंदू लेले ! असे दुसरे उदाहरण मिळणे, सर्वथैव अशक्यच ,असे मला वाटते. या निरपेक्ष वृत्तीला, त्रिवार वंदन !
श्री. चंदू यांना, संगीताचा म्हणजेच बासरी वादनाचा, छंद आहे. ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची, " संगीत विशारद " ही परिक्षा उत्तम रीत्या, उत्तीर्ण झालेले आहेत. आपला छंद म्हणून, पहाटेच्या शांत वेळी ,ते बासरी वादनाचा रियाज करतात. ज्याला इच्छा आहे, त्याला सायंकाळी बासरी वादन शिकवितात. श्री. चंदू निरपेक्ष वृत्तीने, बा
सरी वादनाचे कार्यक्रम ही करतात. थोडक्यात, ते आपला छंद जोपासून ,आपला वेळ आनंदात घालवितात.
श्री. चंदू ,आता ६४ वर्षांचे आहेत. यांना दोन मुले. थोरला मुलगा चि. गौरांग ,आर्किटेक्ट आहे. तो पुण्यात आपला व्यवसाय करतो.धाकटा मुलगा चि. सत्यजीत ,श्री. चंदू यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय ,उत्तम प्रकारे सांभाळतो. दोन्ही मुले विवाहित असून, त्यांना एक नातवंड ही आहे. सौ. गायत्री वहिनींची श्री. चंदू यांना, सर्वार्थाने समर्थ साथ आहे.
अशा या आगळ्या वेगळ्या व्यक्तीमत्वाच्या, श्री. चंदू आणि सौ. गायत्री वहिनी आणि त्यांच्या सर्व परिवाराला उदंड ,निरामय आयुष्य लाभू दे , सर्व ऐहिक आणि पारमार्थिक सुखांचा वर्षाव ,त्यांच्यावर होउ दे , ही ईश चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment