संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे...
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः ।।
अर्थ.... तुम्ही मनात योजलेले काम किंवा तुमचे मनोरथ , उद्योग ( धडपड ) केल्या शिवाय ,साध्य होणार नाहीत. कारण , झोपलेल्या सिंहाची ( भूक भागविण्यासाठी ), कोणते ही हरिण स्वतःहून ,त्याच्या तोंडात शिरत नाही.
या सुभाषिताशी सुसंगत ,अशा एका प्रगतीशील व धडपड्या तरूणाची, मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. असा तरूण आमचा शेजारी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या तरूणाचे नाव आहे ,श्री. सागर लोया.
श्री. सागर यांचे लहानपण , कष्टात आणि त्रासातच गेले. ते काॅलेजमध्ये शिकत असताना, आपला खर्च आपल्या कुटूंबावर पडू नये म्हणून, त्यांनी नोकरी केली. त्या नोकरीचा अनुभव विचारात घेऊन, त्यांनी धडपड करत ,स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीच्या काळात, अपेक्षे प्रमाणे फायदा होत नव्हता. पण जिद्दीने पाय रोवून उभे राहून, त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली व आज ते यशस्वी व्यावसायिक झालेले आहेत.
आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ,ते असा कोणता व्यवसाय करीत आहेत ? उत्तर आहे........
" Financial Adviser " ( आर्थिक सल्लागार ) ! श्री. सागर लोया , " आर्थिक सल्लागार " आहेत.
तुम्ही तुमचे पैसे सरधोपट विचार करून, बॅंक , पोस्ट इत्यादीत ठेवले , तर तुम्हाला जे व्याज मिळेल, त्याने तुम्ही फक्त वाढत्या महागाईशी, कसाबसा सामना करू शकाल. पण तुम्हाला त्यातून , आर्थिक फायदा मिळणार नाही. जाणवण्या इतपत किंवा भरपूर आर्थिक फायदा मिळवायचा असेल , तर तुम्हाला थोडाफार धोका पत्करावाच लागेल. तुम्हाला Aggressive investment ( आक्रमक गुंतवणूक ) करावी लागेल. त्या साठी तुम्हाला ,आर्थिक सल्लागाराची गरज आहे. तो तुमच्या आर्थिक अपेक्षांचा विचार करून, सुयोग्य गुंतवणूक कोणती ते सांगू शकतो.
श्री. सागर , जवळ जवळ सर्व प्रकारच्या, आर्थिक गुंतवणुकी संबंधी सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्या नुसार ,भारतातील केवळ ५ ते ७ % लोक आक्रमक गुंतवणुकीचा विचार करतात. त्यात आर्थिक जाणीव असलेल्या, तरूणाईचेच प्रमाण जास्त आहे. अमेरिकेत हेच प्रमाण ,जवळ जवळ ३० ते ३५ % आहे.
श्री. सागर लोया यांचे वय ,फक्त ३६ वर्षे आहे. गेली १७ वर्षे ते या व्यवसायाचा अभ्यास करत करत, आता त्यात आता सुस्थिर झालेले आहेत.
श्री. सागर यांना , त्यांच्या " आर्थिक सल्लागार " या व्यवसाया संबंधी अनेक प्रश्न , मी विचारले. उदाहरणार्थ , आर्थिक गुंतवणूकीचे किती प्रकार आहेत ? आक्रमक गुंतवणूकीत फायदे कोणते ? त्यात धोका कशा प्रकारचा व कितपत आहे ? शेअर बाजार म्हणजे नक्की काय ? मेन ब्रोकर व सब ब्रोकर म्हणजे काय ? त्यांचे क्वालिफिकेशन काय असते ? शेअर बाजारातील तेजी आणि मंदी ,कशा मुळे होते ? प्रत्यक्ष गुंतवणूक आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक , म्हणजे काय ? आर्थिक गुंतवणूक सल्लागाराला कोणते कोणते आर्थिक विषय , हाताळावे लागतात ? इत्यादी इत्यादी...... त्या सर्वांची ,त्यांनी सविस्तर आणि समाधानकारक उत्तरे दिली. त्यांच्या त्या क्षेत्रातील सखोल ज्ञानाने, मी अक्षरशः दिपून गेलो.
श्री. सागर लोया यांच्या लहान वयाचा विचार करता , ते अजूनी खूप खूप प्रगती करून ,आपली उन्नती करून घेतील ,यात मुळीच शंका नाही. श्री. सागर यांना त्यांच्या व्यवसायात , त्यांची पत्नी सौ. हिरल लोया यांची बहुमूल्य मदत होते , हे त्यांनी अत्यंत अभिमानाने सांगीतले. त्या दोघांना चि. अरूष हा मुलगा आहे. तो लहान आहे.
एकूण श्री. सागर यांनी ,त्यांच्याशी बोलताना मला आर्थिक विश्वाचे , थोडेफार " विश्वरूप दर्शन " घडविले ,असे म्हणायला हरकत नाही. त्यांची व्यवसायात पुढे जाण्याची सर्वंकष जिद्द पाहून , मी स्तिमित झालो.
शेवटी श्री. व सौ. आणि चिरंजीव लोया परिवाराचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत , त्यांची खूप खूप भरभराट होवो , अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment