नाशिक शहरात अशी एक माता आहे की, ज्यांची " गजानन विजय ", ही शेगावच्या गजानन महाराजांची २१ अध्यायांची पोथी , मुखोदगत आहे. त्यांचे नाव आहे , श्रीमति सुमती बापट , वय वर्षे ८५ फक्त ! अशा पवित्र मातेच्या पोटी जन्म मिळणे, हे भाग्याचे लक्षण नाही का ? अशा भाग्यवंताची ,मी आज तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. रमेश बापट ! बरेच लोक त्यांना " बापट काका ", या नावाने ओळखतात.
श्री. बापट काका काॅलेजच्या पहिल्या वर्षाला असताना, त्यांचे वडील अचानक गेले. अशा वेळी आपल्या वयाचा विचार न करता, कुटूंबाची जबाबदारी आपलीच आहे ,असे मानून शिक्षणाला राम राम ठोकून, त्यांनी नोकरी सुरू केली. सुरवातीला गावकरी प्रेस ,त्या नंतर नाशिक मर्चन्ट्स बॅंक, नंतर ते नाशिकच्या महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीत, १९८३ साली स्थिर झाले.
त्यांचा स्वभाव टापटिपीचा आणि शिस्तीचा आहे. कोणते ही काम किती ही साधे असले, तरी ते अचूक , टापटिपीने आणि आदर्शवत कसे करावे ,हे त्यांच्या कडूनच शिकावे.
श्री. बापट काकांचे हस्ताक्षर, " मोत्याच्या दाण्या " प्रमाणे आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारची आणि रंगाची , १०० पेन्स आहेत. आपल्या स्नेह्याच्या , ओळखीच्या माणसाच्या, वाढदिवसाला किंवा कांही विशेष प्रसंगी, बापट काकांचे स्वहस्ते तयार केलेले ग्रीटींग, ते आवर्जून पाठवितात . त्या ग्रीटींगचा ले आउट , रंग संगती ,एखाद्या कमर्शियल आर्टिस्टला लाजवेल ,अशी आकर्षकच असते.
त्यांना महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या नाशिक प्लॅन्ट मधून ,सेवा निवृत्त होऊन तीन वर्षे झाली आहेत. पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी , त्यांची आज ही आठवण काढतात. नोकरीत असताना श्री. बापट काकांचा एखादा सहकारी ,मदतीची अपेक्षा ठेऊन त्यांच्याकडे गेल्यास ,ते किती ही बिझी असले तरी ,आपले काम बाजूला ठेऊन, हसत मुखाने व आनंदाने मदत करायचे. प्रायव्हेट कंपनीच्या कल्चरचा विचार करता ,ही दुर्मिळ गोष्ट आहे ! कंपनीच्या कामाच्या निमित्ताने, त्यांचा शासकीय अधिकार्यांशी संबंध यायचा. ते अधिकारी त्यांना मानाने वागवायचे . कारण श्री. बापट काकांची कामाची शिस्त आणि त्यांचा दुर्मिळ प्रामाणिकपणा !
सध्या श्री. बापट काकांनी मिरजेच्या " गीता फाऊंडेशन " च्या , सामुदायिक रीत्या करावयाच्या , श्री विष्णूसहस्त्रनामाच्या बारा कोटी आवर्तनांच्या, संकल्पाला वाहून घेतलेले आहे.
श्री. बापट काका डोळसपणे सश्रध्द आहेत. अंधश्रध्दा आणि कर्मकांड ,त्यांना अजिबात मान्य नाही. आपल्या माते प्रमाणे ,त्यांची शेगावच्या " गजानन महाराजांच्या " वर ,नितांत श्रध्दा आहे. आज ही त्यांच्या माहितीतील कोणी आजारी पडल्यास, ते त्या व्यक्तीला वेळोवेळी विचारपूस करण्यासाठी भेटतात. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून, तिथे बसून " रामरक्षा " म्हणतात. केवढा हा जिव्हाळा आणि केवढी ही आपुलकी !
श्री. बापट काकांचा रक्तगट ,बी आरएच निगेटिव्ह आहे. तो दुर्मिळ आहे. या गटाच्या अनेक गरजूंना रक्तदान करून, बापट काकांनी " जीवनदान " दिलेले आहे.
श्री. बापट काकांना एक बहिण आहे. नाव सौ. सुहास जोशी. त्यांच्या पाठीशी ते श्रीकृष्णा प्रमाणे, सतत उभे असतात. श्री .बापट काकांना दोन मुले. मुलगा चि. सुमित, मुंबईत उच्च पदावर नोकरी करतो. मुलगी चि. सई , कथ्थक विशारद आहे. सौ. वहिनींची बापट काकांना, समर्थ साथ आहे . तसेच मातोश्रींचा आशिर्वाद पाठीशी आहेच !
अशा या आदरणीय श्री. बापट काकांना व त्यांच्या कुटूंबियांना ," गजानन महाराजांचा कृपा प्रसाद " सतत लाभो , ही सदिच्छा देतो आणि थांबतो !

No comments:
Post a Comment