सावरकर नगर , नाशिक , मधील आमच्या नवीन घरा जवळचा एक शांत रस्ता !
रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर, शतपावली करायला अतिशय उत्तम !या फोटोत पाठमोरी निघालेली दिसते ती ,माझी पत्नी सौ. रजनी ! तिच्या उजव्या हाताला ,पन्नास फुटावरून ,गोदावरी नदी वाहते. डाव्या बाजूला एकांत नावाचा, एक पाॅश असा रेसिडेन्शियल काॅंप्लेक्स आहे. समोर गंगाजल नर्सरीचा विस्तार आहे. सध्या आम्ही राहतो , तो भाग अतिशय शांत व छान आहे. मी घरात झोपतो ,तिथे शेजारी असलेल्या खिडकीतून ,मला गोदावरी नदीचे दर्शन होते. खूप छान वाटते.
मुलगा , सून , नातू यांच्या सहवासात राहण्याचा , सध्याच्या काळात सहसा दुर्मिळ असणारा आनंद, आम्हाला निश्चितच आहे. त्यात छान परिसर ! म्हणजे दुग्धशर्करा योगच !
वयाच्या या टप्प्यावर आणखी काय पाहिजे ? परमेश्वराचे शतशः धन्यवाद !

No comments:
Post a Comment