नाशिक मधील ,आमचा सकाळचा फिरायचा सदाबहार ग्रुप.... " निरामय जाॅगर्स "....
आमच्या " निरामय जाॅगर्स " ग्रुपचे वैशिष्ठ्य म्हणजे फिरताना आम्ही एकत्र नसतो . जो तो आपापल्या वेगाने फिरतो . आमच्या पैकी कांहीजण , ट्रॅकवर उपलब्ध असलेल्या साधनावर, त्यांना झेपेल असा व्यायाम करतात. सकाळी ट्रॅकवर फिरायला ,प्रत्येकजण आपापल्या वेळी येतो. फिरून झाल्यावर, सात वाजून पाच ते दहा मिनिटांनी, सर्वजण एकत्र गप्पा मारण्यासाठी जमतो. मग थोडावेळ गप्पाटप्पा होतात. गप्पात कोणी ही आपल्या घरातील कांहीही बोलत किंवा सांगत नाही. चर्चेचे विषय जनरलच असतात.
श्री. केसकर सर, मराठी व संस्कृत या विषयातील एखाद्या शब्दाची उकल करून ,छान माहिती देतात. श्री. गुजराथी सर, केमिस्ट्रीतील कांही अनुभव किंवा वैद्यकीय व्यवसायातील एखादी माहिती देतात. श्री. एस. डी . कुलकर्णी सर , नर्म विनोद किंवा अर्थशास्त्रातील कांही गोष्टींचे विवरण करीत असतात. श्री. रामभाउ जोशी , औषधे व त्यांचे परिणाम या विषयी सांगतात. श्री. वाटपाडे , जमिनीची किंवा प्लाॅटची मोजणी त्यात होणारे घोटाळे , या विषयीच्या गमती सांगतात. श्री. व्याही जोशी, त्यांच्या पूर्व जीवनातील अनोखे अनुभव सांगून सर्वांना चकित करतात. श्री. विलास भिंगेंना सर्वजण " शास्त्रिबुवा " म्हणतात. ते त्या विषयी बोलतात. श्री. विलास औरंगाबादकर सर ,शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव सांगुन सर्वांना गंभीर करून ,मग हसवतात. श्री. धनसिंग ठाकूर , स्टेट बॅंकेतील त्यांच्या बदल्या व तिथे भेटलेली वेगळी वेगळी माणसे ,यांचे किस्से रंगवून रंगवून सांगतात. श्री. गुडसूरकर सर, त्याच्या प्राध्यापकीय जीवनातील किस्से सांगून हसवतात. श्री. मुकूंदराव खाडीलकर, यांचा खासगी क्षेत्रातील उच्चपदस्थ अनुभव किंवा त्यांचे वाचन भरपूर असल्याने ,आमच्या जनरल नाॅलेज मध्ये भर घालतात.
मी व श्री. दिलीपराव कुलकर्णी, या सर्वांना वाव देण्यासाठी " उत्तम श्रवण भक्ती " करतो.

बरोब्बर सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ,सर्वांच्या मोबाईलमध्ये, वेगवेगळ्या टोनचे गजर होतात आणि ही गप्पांची रंगलेली मैफिल संपते . त्या नंतर , एकमेकांचा निरोप घेउन, सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी मार्गस्थ होतात.
No comments:
Post a Comment