नाशिक मधील ,आमच्या सकाळच्या फिरायच्या ट्रॅकवर, एक गृहस्थ येतात. वय ९५ वर्षे . सतेज कांती. गोरापान रंग. चालण्याची ढब ही वाखाणण्या सारखी ! त्यांचे नाव आहे डाॅ. फाटक ! काल त्यांना ९५ वं वर्ष संपून ,९६ वं वर्ष लागलं. त्या निमित्त त्यांचा ट्रॅक वरील लोकांनी ,सत्कार केला. या सत्काराच्या निमित्तानं, त्यांच्या सौ. ही ट्रॅकवर आल्या होत्या. ९५व्या वर्षा पर्यंत, आयुष्याच्या जोडीदाराची साथ लाभणं , ही परमेश्वरी कृपाच !
डाॅक्टर फाटक, त्यांच्या धीम्या स्पिडनं ट्रॅकवर फिरतात. समोरून येणार्याने ओळख दाखविल्यास ,त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलतात. त्यांच्या कडे विनोदांचा स्टाॅक भरपूर आहे. तसेच त्यांचा शेरोशायरीचा अभ्यास ही, खूपच चांगला आहे. समयोचित शेर सादर करून, ते सर्वांची वाहवा मिळवतात. विनोद आणि शेरोशायरी ,त्यांच्या मनाचा ताजेपणा दर्शवतात. ९५ व्या वर्षी, ज्या वेळी मनुष्य पैलतीराकडे नजर लाउन सुटकेची वाट पहात असू शकतो ,त्या वेळी डाॅक्टर फाटक , प्रसन्न मुद्रेने ट्रॅकवर फिरत ,आपल्या अस्तित्वाने आनंदाचा वर्षाव इतरांवर करत , स्वतः ही आनंद लुटत असतात.
आज त्यांचा सत्कार झाला त्या नंतर त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगीतले...
१. रोज जमेल तितके चालतो. त्यात हयगय करीत नाही.
२. घरी गेल्यावर न चुकता थोडाफार व्यायाम ही करतो.
३. जिभेवर नियंत्रण ठेवतो.
ते पुढे, विनोदाने म्हणाले कीं , परश्वराला जो आवडतो त्याला तो लवकर बोलावून घेतो. मी परमेश्वराला आवडत नसावा , त्या मुळे ,त्याने मला अजूनी बोलावले नाही. त्याची आॅर्डर आली की , येथे कोणी ही क्षणभर ही, थांबू शकत नाही. माझी अजूनी आॅर्डर आलेली नाही. आजच्या जमान्यात कुठली ही आॅर्डर " कांही " दिल्या शिवाय निघत नाही आणि अशा कारणासाठी द्यायला, माझ्याकडे " कांही " शिल्लक ही नाही. बोलता बोलता त्यांनी ,एक शेर ऐकवला....
चलनेवाले जल्दी जाते नही
बैठनेवाले जाते है
बैठनेवाला भी जल्दी जाता नही
अगर वो कम खाता है
शेवटी त्यांनी गालिबचा एक छान शेर पेश केला...
मुस्कान बनाये रख्खो
तो दुनिया साथ देती है
आॅंसूओंको तो
आॅंखे भी पनाह नही देती.,..
अशा या चिरतरूण व सदाबहार ,डाॅक्टर फाटकांना परमेश्वराने उदंड व निरामय आयुष्य द्यावे अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment