आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ती म्हणजे पुण्यातील एके काळचे प्रसिध्द फोटोग्राफर श्री. नीलकंठ विनायक उर्फ बाबा अर्जुनवाडकर यांची ! मला सांगायला अभिमान वाटतो की बाबा हा माझा आत्ते भाऊ आहे.
बाबाचे वडील हे संस्कृत पंडीत होते. त्याचे संस्कृत पंडीत असलेले काका , श्री. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे नाव पूर्वीच्या पिढीतील सर्वांना माहिती असेलच ! बाबाचे वडील संस्कृत पंडीत होतेच , पण त्यांना फोटोग्राफीची ही विशेष आवड होती. तो वडीलोपार्जित वारसा बाबाने निष्ठेने चालविला.
बाबाचे वडील लवकर गेले त्या मुळे बाबा आणि त्यांच्या सर्व कुटूंबाला बेळगावहून पुण्याला यावे लागले. पुण्यात आल्यावरचे त्या सर्वांचे दिवस अतिशय कष्टात गेले. पुण्यात आल्यावर पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून बाबाने फोटोग्राफी सुरू केली. व्यवसाय करायचा म्हटलं की , ज्याला बाजारात मागणी आहे , तेच करावे लागते. बाबाने लग्न , मुंजी , शाळांची स्नेह संम्मेलने यांचे फोटो काढण्या साठी अक्षरशः रात्रंदिवस धावपळ केली. मिळेल ते काम करायचे , पण ते मन लाउन आणि जीव ओतूनच करायचे , ही त्याची निष्ठा होती. कांही दिवसा नंतर ज्यांना फोटोग्राफीतलं कळतं , त्यांना याची जाणिव झाली की , बाबाच्या फोटोत कांही तरी वेगळे सौंदर्य आहे. जागा तीच , माणसे ही तीच , पण दुसर्या फोटोग्राफरने काढलेल्या फोटो पेक्षा, बाबाचा फोटो सरसच असायचा. ज्याचा फोटो घेतोय त्याची भावमुद्रा , कॅमेरा अॅंगल , फोटोची क्लॅरिटी , करेक्ट एक्सपोजर इत्यादी तांत्रिक बाबी शिवाय बाबाची जी, साधनेतून कमविलेली सौंदर्य दृष्टी होती , त्या मुळे , त्याने काढलेला फोटो कधी ही उजवाच असायचा !
बाबाला संगीताची ही खूप आवड आहे. तो त्यातला दर्दी ही आहे. गायकाने पहिला " साssss" लावला की, राग ओळखणारे " कानसेन " असतात. बाबाचा त्या " कानसेनात " बराच वरचा नंबर आहे.
पुण्यातल्या " सवाई गंधर्व " या कार्यक्रमाला तो आवर्जून हजेरी लावतोच लावतो. तिथे गायन किंवा जी कला सादर होत असेल , त्यांचे असंख्य फोटो बाबाने काढलेले आहेत. हे सर्व फोटो तुम्हाला त्याच्या फेसबुक अकाउंटवर पहायला मिळतील. अनेक नामवंत कलाकारांनी , बाबाच्या फोटोचे कौतूक करून , ते आवर्जून त्याच्या कडून , स्वतः साठी मागून ही घेतलेले आहेत. असे फोटो त्यांच्या " ड्राॅईंग रूम " ची शोभा नक्कीच वाढवत आसणार , ही खात्री आहे !
बाबाचे आणि सौ. अपर्णा वहिनींचे, आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे, ते आपल्या प्रेमळ स्वभावाने , सर्व नातेवाईकांशी , संबंध आणि संपर्क ठेउन आहेत. आज काल हे दुर्मिळ आहे.
असा हा माझ्या पेक्षा तीन वर्षांनी वडील असलेला , माझा आतेभाऊ बाबा , सध्या, खूप अाजारी आहे. त्याला दोन मुली आहेत. चि. सौ. मधुरा आणि चि. सौ. सायली ! त्या दोघी , त्याची आणि सौ. अपर्णा वहिनींची काळजी घेतात. त्यांना माझ्या दुसर्या आतेभावाचा मुलगा चि. ॐकार याची ही मोलाची साथ असते. सौ. अपर्णा वहिनींची ही तब्बेत उत्तम आहे , अशातला भाग नाही. बाबा आणि सौ. वहिनी एकमेकाला सांभाळून राहतात.
अशा या माझ्या आत्तेभावाची म्हणजेच बाबाची, तब्बेत लवकर सुधारो , त्याला आणि सौ, अपर्णा वहिनींना परमेश्वराने उत्तम निरामय आयुष्य द्यावे , अशी परमेश्वरा जवळ कळकळीची प्रार्थना करतो आणि थांबतो.
खाली फोटोत कॅमेर्यासह दिसतो तो श्री. बाबा अर्जुनवाडकर . बाकीचे त्याने काढलेले फोटो आहेत. त्यात आहेत , पंडीत जसराज , कौशिकी चक्रवर्ती , उस्ताद झाकीर हुसेन आणि हरिप्रसाद चौरासिया !

No comments:
Post a Comment