" अनुभव करोना "
*****************
आज दि. १५ मे २०२० रोजी ,माझा मेरीतला स्नेही श्री. अनिल कुलकर्णी , वय ७१ , हाॅस्पिटल मधून घरी गेला.
त्याला ३० एप्रिलला स्कूटरचा अॅक्सिडेंट झाला. स्कूटरवर बसूनच त्याने साईड स्टॅंड लावला. तो लागला असे त्याला वाटले. पण तो लागला नव्हता. त्याने स्कूटर सोडताच तीच त्याच्या पायावर पडली. तो ही पडला. त्याचे खुब्याचे हाड फ्रॅक्चर झाले. डाव्या खुब्यातला बाॅलच तुटला . तसेच डाव्या हाताच्या मनगटाला ही फ्रॅक्चर झाले होते. तो पडल्या पडल्या, शेजार पाजारच्या लोकांनी त्याला गंगापूर रोड जवळील डाॅ. उमेश कुलकर्णी यांच्या दवाखान्यात अॅडमिट केले. एक्स रे वगैरे काढले आणि दोन्ही ठिकाणचे आॅपरेशन करण्याची गरज असल्याचे डाॅ. नी सांगीतले.
त्याचा मुलगा , सून , नात पुण्याला आणि जावई ,मुलगी , नात मुंबईला असतात. प्रयत्न करून ही त्यांना करोनाच्या लाॅकडाउन मुळे आणि जिल्हा बंदी मुळे , येणे जमणार नाही , हे नक्की झाले. मग त्याच्या मुलाने डाॅ. उमेश कुलकर्णी यांना फोन करून , तुम्ही सर्टिफिकेट दिले तर मी पुन्हा प्रयत्न करतो ,असे सांगीतले. त्यावर डाॅ. उमेश कुलकर्णी म्हणाले " तू नाशिकला आलास तर तुझ्या वडीलांना व पर्यायाने आम्हा सर्वांना करोना इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. शिवाय तू पुण्याहून आलास तर, पोलिस प्रशासन ,तुला येथे प्रथम १४ दिवसाचे क्वारंटाईन करतील. तेंव्हा तू येउ नकोस. आम्ही व तुझ्या बाबांचे मित्र मिळून त्यांची काळजी घेउ ".
मग त्याच्या आॅपरेशनच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व टेस्ट्स करण्यात आल्या. त्यात करोना संबंधीची ही टेस्ट होती. सर्व टेस्ट रिपोर्टस नाॅर्मल आल्या नंतर ,त्याचे ४ मे रोजी मेजर आॅपरेशन झाले. खुब्याचा बाॅल बदलण्यात आला. त्या दिवशी रात्री तो रिकव्हरी रूम मध्येच होता. मग सौ. वहिनींच्या बरोबर सोबतीला माझी मिसेस सौ, रजनी , रात्रभर तिथे थांबली.
आॅपरेशनच्या तिसर्या दिवशी डाॅक्टरांनी त्याला वाॅकरच्या सहाय्याने थोडेफार चालविले. पाचव्या दिवशी त्याला जिना चढायला लावला आणि डिसचार्ज घ्यायला परवानगी दिली.
आता प्रश्न होता तो म्हणजे घरी गेल्यावर टाॅयलेटला कसे जायचे ? घरातल्या घरात फिरताना आधार कोण देणार ? समजा चालताना याचा तोल गेला, तर त्या वहिनींना , ज्यांचे वय ६६ आहे , शिवाय त्यांचे गुडघे ही खूप दुखतात , अशा परिस्थितीत त्याला आधार देणे, झेपेल का ? नाही तर दोघे ही पडायची भिती ! हाॅस्पिटलमध्ये या सर्व गोष्टींच्या वेळी मदत करायला हाॅस्पिटलची माणसे असायची. घरी हे सगळे कसे जमणार ? शिवाय तो पहिल्या मजल्यावर राहतो. लिफ्ट नाही.
ही सर्व परिस्थिती त्याने डाॅ. ना सांगीतली. डाॅ. नी त्याला पुढे सात दिवस हाॅस्पिटल मध्ये राहण्याची परवानगी दिली.
हाॅस्पिटल मधील माणसांच्या सहकार्याने या सात दिवसात त्याने वाॅकर सह व्यवस्थित चालण्याचे आणि जिना चढण्याचे प्रॅक्टीस केले व मुख्य म्हणजे आपल्याला घरी गेल्यावर कुणाची ही मदत न घेता , एकट्याने हे सर्व करण्या इतपत आत्मविश्वास स्वतःत निर्माण केला.
आज त्याला डिसचार्ज मिळाला. मी व माझी पत्नी आणि त्याच्या मुलाचा एक मित्र असे त्याला हाॅस्पिटल मधून कारने घरी नेले. वाॅकरच्या मदतीने तो जिन्या पर्यंत गेला. नंतर हळू हळू जपून जपून, तो कुणाच्या ही मदती शिवाय, जिना चढून घरात गेला.
त्या क्षणी आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले होते.
मुलगा आणि मुलगी, करोना लाॅक डाउन मुळे ,जवळ नसताना त्या दोघांनी ज्या धीराने आल्या प्रसंगाला तोंड दिले , त्या बद्दल ते दोघे अभिनंदनास निश्चितच पात्र आहेत.

करोना आणि लाॅकडाउनच्या काळातला हा एक वेगळा " अनुभव करोना ".......
No comments:
Post a Comment