माझ्या लग्नाची चित्तरकथा ज्याला अथ पासून इति पर्यंत माहिती होती आणि ज्याने ऐन मोक्याच्या क्षणी, आम्हाला दोघांना मोलाची मदत केली , असा माझा मिरजेचा खास जवळचा मित्र म्हणजे , श्री. श्रीकांत दिनकर पोंक्षे . आम्ही त्याला " श्री " च म्हणतो !
श्री बरोबर माझे सुरवातीला अजिबात सख्य नव्हते. पण नंतर आमची मैत्री अशी जमली की , एखाद्याला वाटावे की , यांचे जन्म जन्मांतरीचे मैत्र आहे. मिरजेत आमची घरे जवळ असल्याने , दिवसातून आम्ही भरपूर वेळी एकमेकांना भेटत असू .
श्री हा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियंता आहे. तो जर मिरज सोडून बाहेर नोकरीसाठी गेला असता तर , स्वतःच्या बुध्दीमत्तेच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर , तो कुठल्या ही खासगी कंपनीत नक्की " जनरल मॅनेजर " किंवा त्या ही पेक्षा वरच्या पदावर गेला असता , असे मी खात्री पूर्वक म्हणू शकतो.
पण तो योग नव्हता. कारणे दोन . तो आई वडीलांचा एकूलता एक मुलगा होता आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे त्याची तब्बेत ! तब्बेत मना सारखी साथ देत नसल्याने त्याला मिरज सोडायला जमले नाही.
तो मिरज सारख्या मध्यम दर्जाच्या गावात एका कंपनीत अभियंता होता . त्या शिवाय तो सांगली ITI मध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जात होता. दोन्ही ही ठिकाणी त्याने आपल्या ज्ञानाने आणि कार्यकौशल्याने चांगले नाव कमविले होते.
त्याला दोन मुले. दोघे ही उत्तम अभियंता आहेत. दोघे ही पुण्यात असतात. पुण्यात घर घेणे किती अवघड आहे याची बहूतेकांना कल्पना असेलच ! मुलांच्यासाठी व त्यांच्या जवळ आपण दोघांनी रहायचेच , या जिद्दीवर , त्याने एका झटक्यात , आपला मिरजेतला राहता बंगला विकला आणि पुण्यात मुलांची व आपली रहायची व्यवस्था केली. त्याचा हा निर्णय त्यावेळी फार धाडसी होता. पुण्यात , मुले , सुना आणि श्री व सौ. वहिनीं यांच्यात मतभेद झाले व कांही कारणांनी एकत्र राहणे कठीण झाले , तर त्या दोघांनी काय करावं ? अशी भिती , आम्हाला त्या वेळी ,अस्वस्थ करीत असे. पण श्री आणि सौ. वहिनी अतिशय निर्धास्त होते . चांगल्या भावनेनं केलेलं कोणतं ही काम , चांगलेच फळ देते ! ही उक्ती सार्थ ठरली !
आताची आनंदाची बाब म्हणजे , दोन्ही मुलांचे पुण्यात समोरा समोर फ्लॅट आहेत. तो आणि सौ. वहिनी दोघे ही आपली दोन्ही मुले आणि सुना , नातवंडासह पुण्यात आनंदात आहेत. आज काल आई वडील आणि मुले वेगळी वेगळी राहण्याच्या जमान्यात , श्री पोंक्षे च्या घरातला एकोपा वाखाणण्या सारखाच आहे. सर्वजण श्री आणि सौ. वहिनी यांचा योग्य मान ठेवतात आणि त्यांची मना पासून काळजी ही घेतात . हे खूप खूप दुर्मिळ दृष्य आहे . या बाबतीत ते दोघे नक्कीच भाग्यवान आहेत . श्री ला सौ. वहिनींची समर्थ साथ नक्कीच आहे.
अशा माझ्या दिलदार आणि अगदी जवळच्या मित्राला उत्तम आयुरारोग्य लाभो. त्याच्या वर आणि त्याच्या सर्व कुटूंबावर सर्व सुखांचा वर्षाव होवो , ही सदिच्छा देतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment