आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, ती एका लढवय्या स्त्रीची , ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडून ,आपले कर्तव्य मोठ्या निष्ठेने आणि नियोजनबध्द रीतीने पार पाडले.
मी ओळख करून देणार आहे त्यांचे नाव आहे, श्रीमति वसुधा कृष्ण वाटवे. आजचे त्यांचे वय आहे ८९ वर्षे. तब्बेत आज ही वयाच्या मानाने उत्तम आहे. मी व त्यांचे परिचित त्यांना सुधाताई असे म्हणतो.
ती. सुधाताईंचे मिस्टर डाॅक्टर होते. डाॅ. कृष्ण वाटवे. त्या काळातले MBBS. सांगलीत उत्तम प्रॅक्टिस होती. पण डायबेटिसने घात केला. प्रकृतीत गुंतागुंत होत गेली व त्यातच त्यांचे निधन झाले. सौभाग्यवती सुधाताई, एका क्षणात ,श्रीमति सुधाताई झाल्या. वय अवघे ३५ च्या आसपास. तीन मुले , सासू सासरे यांची संपूर्ण जबाबदारी, अचानक अंगावर पडली. तशा ही प्रतिकूल परिस्थितीत ,त्यांनी आपले पदवीचे शिक्षण आणि बी, एड . ही पूर्ण केले. नंतर एका शाळेत त्या शिक्षिका , म्हणून रूजू झाल्या.
सासू सासर्यांचं रोजचं हवं नको पहायचं. तीन मुलांनी व्यवस्थित मार्गी लागावं म्हणून ,त्यांच्यावर लक्ष ठेवायचं , घरातलं सगळं पहायचं व शिवाय नोकरी ही करायची. कसं केलं असेल त्यांनी ? नवर्याची वडीलोपार्जित शेती होती. त्याचे ही प्राॅब्लेम्स ,कांही कमी नसत. एक चांगली बाब म्हणजे त्यांचे शेतीचे वाटेकरी, अतिशय प्रामाणिक व मदत करणारे होते.
मुले मोठी झाली. त्यांचा शिक्षणाचा खर्च , घरखर्च , त्या मानाने शिक्षक या नात्याने मिळणारी आवक, मर्यादितच होती. अशा ही अवस्थेत त्यांनी केवळ स्वतःच्या हिंमतीवर ,कोणाच्या ही मदतीची अपेक्षा न धरता, पुढचा संसार अक्षरशः ओढला. मुलांना व सासू सासर्यांना कांहीही कमी पडू न देता....
आता वयाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना ,त्यांना अतिशय समाधान आहे. इतरांना कुणाला त्या अमूक ठिकाणी कमी पडल्या , तमूक ठिकाणी कमी पडल्या, असे म्हणता येईल ही ! पण त्या त्या वेळी त्यांनी आर्थिक किंवा इतर बाबतीत घेतलेले निर्णय, त्या त्या परिस्थितीचा त्रयस्थपणे विचार केल्यास, योग्यच होते, असे काळाच्या कसोटीवर सिध्द झालेले आहे.
ती. सुधाताईंचा स्वभाव तसा कडक व काटेकोर आहे. पण तो त्यांनी माहेरी व सासरी जे अनुभवले , भोगले, त्या मुळेच तो तसा तयार झालेला आहे. त्या बाबतीत त्यांना मुळीच दोष देता येणार नाही.
ती.सुधाताईंचा मुलगा शासकीय नोकरीतून ,उच्चपदस्थ अधिकारी म्हणून ,निवृत्त झालेला आहे. एक मुलगी ,डाॅक्टर पत्नी आहे. धाकटी मुलगी कॅन्सरने गेली. तिच्या अकाली निधनाचे ,त्यांच्या सर्व कुटूंबियांना दुःख आहेच ! सुधाताईंना चार नातवंडे आहेत. सर्वजण आपल्या आपल्या जागी ,सुव्यवस्थित आहेत.
ती. सुधाताई सध्या मुला सोबत सांगली , ( विश्रामबागला) राहतात. त्यांना डायबेटिस आहे ,पण गोळी न घेता केवळ आपल्या आहार विहारावर नियंत्रण ठेवून , त्यांनी तो काबूत ठेवला आहे , ही बाब खूप महत्वाची आहे.
अशा या आमच्या आदर्श गृहिणी असलेल्या ती. सुधाताईंना उत्तम निरामय आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment