माझे नातू....
मला दोन नातू आहेत. फोटोत डाव्या बाजूला दिसत आहे तो चि. निषाद , मुलाचा मुलगा आणि उजव्या बाजूला दिसत आहे तो, चि. मानस , मुलीचा मुलगा !
चि. मानस बाराव्वीला आहे व चि. निषाद सातवीला आहे. दोघेही मनाने अतिशय प्रेमळ आहेत. दोघांना ही आपले नातेवाईक सारखे यावेत , भेटावेत असे वाटत असते. पण ते नेहमीच शक्य असते असे नाही. " गुगल मीट " वर सगळ्यांना बोलावून ते दोघे आपली नातेवाईकांना भेटायची हौस भागवत असतात.
चि. मानसच्या जन्माचे वेळी २००४ साली मी नाशिकला नोकरीत होतो. चि. मानसचा जन्म मिरजचा ! त्याच्या जन्मा नंतर दुसर्या दिवशी, त्याला पहायला मी मिरजला गेलो. चि. मानस म्हणजे उत्साहाचा झराच होता. इतक्या जोरात हातपाय हलवत असायचा की हा दमत कसा नाही , याचं आश्चर्य वाटावं ! रडायला लागला की असला जोरात किंचाळायचा, की ऐकवत नसे. त्याच्या लांबच्या आज्जी त्याला पहायला मिरजला आल्या असताना त्याचा रडण्याचा आवाज ऐकून " हा आमच्या चिक्कोडीचा आवाज आहे " असं म्हणून खूष झाल्या होत्या. लहानपणीचा मानस अल्लड आणि चांगलाच दंगेखोर होता. घरभर त्याचं बारीक लक्ष असायचं. आता चि. मानस मोठा झालाय. मिसरूड फुटलय. तो आता खूपच जबाबदारीने वागतोय. चि. मानसनं त्याच्या वडीलांच्या प्रमाणेच वकील व्हावं असं मला वाटतय. अर्थात तो जे करेल ते योग्यच करेल अशी मला खात्री आहे.
चि. निषाद हा माझा दुसरा नातू. तो अजूनी अल्लडच आहे. चि. निषादच्या जन्माचे वेळी २००७ साली मी सेवानिवृत्त झालो होतो. त्या दिवशी आम्ही कोल्हापूरला मुलीकडे गेलो होतो. सुनेला दवाखान्यात नेल्याचा व्याह्यांचा फोन आला. आम्ही तातडीने कोल्हापूरहून मिरजेला आलो. चि. निषादच्या जन्मानंतर त्याला एका ट्रे मध्ये ठेवले होते. तिथे त्याला पहायला प्रथमच आम्ही गेलो. छान टकमक पहात होता. आम्ही मुला बरोबरच रहात असल्याने ,चि. निषादचा भरपूर सहवास मिळाला आहे. त्याची आणि माझी दोस्तीच आहे म्हणाना ! त्याला दंगा करायची लहर आली की तो आजही माझ्याकडे धाव घेतो.
नातवंडे म्हणजे " दुधावरची साय " असे म्हणतात. माझी दोन्ही नातवंडे अतिशय लाघवी आणि प्रेमळ आहेत.
नातवंडे मोठी झाली की त्यांच्या संसारात त्यांच्या बरोबर रहायची माझी इच्छा आहे. पण ती पूर्ण होणं कठीणच आहे. चि. मानस आज सोळा वर्षाचा आहे व चि. निषाद बारा वर्षाचा ! त्यांचे संसार सुरू होई पर्यंत मी " असण्याची " शक्यता कमीच आहे.
मी कुठे ही असलो तरी त्या दोघांना माझे सदैव भरभरून शुभाशिर्वाद आहेतच !
चि. मानस आणि चि . निषाद , खूप मोठे व्हा आणि आपल्या आई वडीलांना भरभरून सुख व समाधान द्या आणि तुम्ही ही ,सुखासमाधानात रहा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment