मिरज शहरात ब्राह्मणपुरीत ,पूर्वी हमखास नजरेत भरणारे व्यक्तीमत्व म्हणजे, कै. हणमंतराव गाडगीळ ! तानाजी मालुसरे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, यांचे मिश्रण असलेल्या झुबकेदार मिशा , गोरापान रंग , मध्यम उंची ,कमावलेली देहयष्टी , डोक्यावर कधी कधी स्वतः बनविलेली विशिष्ठ टोपी ! असे रूबाबदार व्यक्तीमत्व म्हणजे ,कै. हणमंतराव गाडगीळ ! कै. हणमंतराव गाडगीळांचे व्यक्तीमत्व, विविधांगी होते.
कै. हणमंतराव , मिरजेच्या कन्या शाळेत, कला शिक्षक होते. कन्या शाळेत दरवर्षी नवरात्रात, सरस्वतीच्या मूर्तिची प्रतिष्ठापना होत असे. ती सरस्वतीची मूर्ति ,कै. हणमंतराव स्वतःच्या कल्पनेने, दरवर्षी नवीन बनवित असत . त्यांना जन्मजात मूर्तिकलेची जाण होती. गणेशोत्सवात ते अनेकांना, सार्वजनिक आणि घरगुती गणपती बनवून देत. या सर्व मूर्ति ते स्वतः घडवित असत . साच्यातून मूर्ति बनविणे, त्यांना आवडत नसे. मूर्तिकलेची जन्मजात असलेली जाण ,त्यांनी बनविलेल्या प्रत्येक मूर्तित, प्रकर्षाने दिसत असे.
ते मिरजेच्या भानू तालमीचे, एक अग्रगण्य खेळाडू होते. त्यांनी स्वतःचे गोरे पान शरीर, अतिशय उत्तमपणे व्यायामाने कमविलेले होते. त्यांचे स्वतःच्या श्वसनावर आणि स्नायूंवर ,उत्तम नियंत्रण होते. या नियंत्रणाच्या योगे ,ते पाण्याने भरलेली मोठी घागर ,हात न लावता उचलून ,एका खांद्यावरून दुसर्या खांद्यावर फिरवून ,त्यातील पाण्याचा ऐक थेंब ही खाली न सांडता, परत खाली जमिनीवर ठेवत. हात न लावता, केवळ स्नायू आणि श्वसनावर नियंत्रण ठेउन, ही किमया साधणारे व्यायामपटू आता सापडणे अशक्य आहे , असे माझे स्पष्ट मत आहे.
तसेच ते जिम्नॅस्टिक्सपटू ही होते. त्यांनी मुलांचे व मुलींचे जिम्नॅस्टिक्सचे संघ, भानू तालमीत तयार केलेले होते. या संघांनी राज्य जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत, कै.हणमंतराव यांच्या मार्गदर्शना खाली, उज्वल यश संपादन केलेले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.
कै. हणमंतराव उत्तम अभिनेता होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो , रायगडला जेंव्हा जाग येते , स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संन्यस्तखड्ग इत्यादी नाटकात ,उत्तम अभिनय करून, रंगभूमीची सेवा केलेली आहे. मराठी नाट्य परिषदेच्या, मिरज शाखेचे अध्यक्षपद, त्यांनी कांही काळ भूषविलेले आहे. ते चांगले तबला वादक होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती.
या व्यतीरिक्त आणखीन एक दुर्मिळ वैशिष्ठ्य, कै. हणमंतरावांच्या जवळ होते ! ते पगड्या तयार करीत असत. ही दुर्मिळ कला, त्यांनी स्वतः आत्मसात केलेली होती. पुणेरी , मल्हारशाही , होळकरी , मराठेशाही , मावळी अशा सर्व प्रकारच्या पगड्या, ते स्वतः तयार करीत असत. त्यांच्या पगड्या ,वजनाला अतिशय हलक्या असत. त्या मुळे त्यांच्या पगड्यांना, नटवर्य कै. प्रभाकर पणशीकर यांच्या सारख्या तज्ज्ञांनी ,वेळो वेळी गौरविले होते. कै. हणमंतराव फेटे बांधण्यात तरबेज होते. माझ्या ऐकण्यात आलेल्या माहिती प्रमाणे ,कै. अटल बिहारी बाजपेयी यांना, एके प्रसंगी कै. हणमंतरावांनी फेटा बांधलेला आहे.
थोडक्यात कै. हणमंतराव गाडगीळ कलाशिक्षक होते, मूर्तिकार होते , मिरजेच्या भानू तालमीचे एक उत्कृष्ठ खेळाडू होते , जिम्नॅस्टिक्सपटू होते , अभिनेता होते , तबला वादक होते , भारतीय शास्त्रीय संगीताचे जाणकार होते , विविध प्रकारच्या टोप्या ,पगड्या बनविण्यात आणि उत्तम प्रकारे फेटे बांधण्यात तरबेज होते.
अशा या हरहुन्नरी आणि मिरज शहराला भूषण असलेल्या व्यक्तीमत्वाचे दि. २१ मे २०१६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.
कै. हणमंतराव गाडगीळ यांच्या विविधांगी स्मृतीस, या लेखाचे माध्यमातून ,त्रिवार वंदन करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment