" आमची मेरी "
**************
" मेरी "....तुम्हाला वाटेल, मेरी म्हणजे मी आज कुणाची ओळख करून देतोय ? मेरी या नावामुळे, तुमचा गैरसमज होउ शकतो . हे कुणा व्यक्तीचे नाव नाही. मेरी हे एका शासकीय आॅफिसचे नाव आहे. M.E.R.I. म्हणजेच Maharashtra Engineerin Research Institute. ( महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ). महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाची ही संशोधन संस्था ,नाशिक ,येथेआहे. पाटबंधारे प्रकल्पावर किंवा राज्यातून जाणार्या महामार्ग बांधणीत येणार्या समस्यावर किंवा अनेक मजली बिल्डींगच्या बांधकामात येणार्या अडचणीवर, अभ्यास करून , त्या समस्येची उकल या संस्थेत केली जाते.
या समस्यांवर आधारित संशोधन प्रबंध !राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात, सादर केले जातात. या संस्थेत, अभियंते आणि वैज्ञानिक, असे दोन प्रकारचे लोक काम करतात. अभियंत्यांची मेरीतून बाहेर किंवा बाहेरून मेरीत अशी बदली होते. पण वैज्ञानिक ,कायमचे मेरीतच कार्यरत असतात. त्यांची सहसा बदली होत नाही. संशोधन ही, सलग व सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यात अभियंते व वैज्ञानिकांचा खूप मोठा सहभाग आहे.
मेरीत, संशोधनाचे काम असल्याने ,येणारा प्रत्येक दिवस वेगळा असायचा. मेरीत संशोधनाचे दृष्टीने मातीवर , सिमेंटवर , रस्त्यासाठी वापरल्या जाणार्या डांबरावर , विविध शासकीय किंवा खासगी बिल्डींगच्या बांधकामात येणार्या समस्यांवर , पिण्याच्या पाण्यावर , तसेच धरणांच्या विविध प्रतिकृृृृती, तयार करून त्यावर , विविध विभागात विविध प्रकारच्या चांचण्या , होत असतात. चांचण्या करून मिळालेल्या निष्कर्षावर सुयोग्य विचार करून, मिळालेला निष्कर्ष योग्य आहे की नाही , नसल्यास तो तसा का आला नाही , असे बुध्दीला चालना देणारे काम ,मेरीत चालते. हे मी थोडक्यात सांगीतले. या पेक्षा भरपूर क्लिष्ट विषय मेरीत हाताळले जातात आणि नंतर त्यावर, संशोधन प्रबंध लिहीले जातात.
अशा या संस्थेत बदलीवर आलेले निवडक अभियंते आणि आयुष्यभर मेरीतच नोकरी करीत असलेले वैज्ञानिक , यांना या संस्थे बद्दल , मनात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झालेला दिसतो . केलेल्या कामाचे चीज झाले की , कामाचा उत्साह दुणावतो आणि दुप्पट जोमाने तो कामास लागतो.
मेरीचा वरिष्ठ अधिकारी वर्ग ,संशोधनाला चालना देणारा किंवा त्यात रस असणारा असल्यास ,कामाची गुणवत्ता, फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. या संदर्भात ,मेरीचे एके काळी संचालक असलेल्या ,श्री. पां. कृ .नगरकर साहेबांची आठवण झाल्या शिवाय रहात नाही.
मेरीत काम करणार्यांना, शासकीय निवासस्थाने मिळायची. मेरीची स्वतंत्र काॅलनी आहे. ही काॅलनी म्हणजे, एके काळी एक मोठे कुटूंबच असायचे. काॅलनीत वेगवेगळे सण , उत्सव मोठ्या उत्साहाने व सहकुटूंब सहपरिवारासह साजरे व्हायचे. गणेशोत्सवात नाटके व विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यात लहान , मोठे सर्वजण मनसोक्त आनंद लुटत असत. त्या शिवाय आनंदमेळा ही असायचा. त्यात विविध खाण्याचे स्टाॅल्स असत. एकूण खवय्यांची चैन असे. तसेच मेरीच्या आॅडिटोरियम मध्ये, विविध चित्रपट दाखविले जायचे. त्या काळी घरोघरी टिव्ही नसल्याने व काॅलनी शहरा पासून लांब असल्याने ,मिळणारी ही करमणूक मोठी मोलाची वाटत असे. काॅलनीतील प्रत्येकजण ,त्याचा पुरेपुर आनंद लुटत असे.
पुढे काळ बदलला , तसे सर्वच बदलले. काॅलनी ओसाड पडली , मेरी आॅफिस मधील विविध विभाग बंद झाले. अभियंत्यांची आणि वैज्ञानिकांची पदे कमी झाली. मेरीचा सुवर्णकाळ ,ज्यांनी पाहिला आहे व अनुभवला आहे त्यांना आजची मेरीची अवस्था पाहून ,अक्षरशः डोळ्यात पाणी येते. पण याला इलाज नाही. कालाय तस्मै नमः ।
आम्ही मेरीत काम केलेले व आता सेवानिवृत्त झालेले लोक ,एकमेकांना कारण परत्वे भेटतो आणि जुन्या आठवणीत रमतो. " मेरी " ,हा आमच्या काळजाचा एक अविभाज्य भाग आहे.
खाली दिसते ती आमच्या परमप्रीय " मेरी " ची देखणी इमारत !

No comments:
Post a Comment