नुकतीच मी तुम्हाला, माझ्या मुलीच्या सासर्यांची म्हणजेच माझे व्याही श्री. रामभाउ कुलकर्णी, कारदगेकर , यांची ओळख करून दिली. आज, मी तुम्हाला माझ्या सुनेचे वडील , म्हणजेच माझे व्याही कै. विश्वनाथ पांडूरंग दांडेकर ,यांची ओळख करून देणार आहे.
दांडेकर जरी माझे व्याही असले ,तरी आमचे दोघांचे संबंध ,अगदी मित्रत्वाचे होते. दांडेकर हे ITI मधून २००७ साली ,वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर, त्यांनी आपल्या वेळेचे नियोजन ,व्यवस्थित केलेले असल्याने ,ते कधी कंटाळलेले दिसलेच नाहीत. गप्पा मारायला , बोलायला आवडत असल्याने , त्यांनी मित्र परिवार भरपूर जमा केलेला होता. त्यांच्या मित्र परिवारात ,सर्व धर्मीय मित्र होते. सर्वांशी त्यांचे संबंध अतिशय घनिष्ठ, असेच होते.
त्यांना दोन मुले. मोठा मुलगा अभय आणि दुसरी प्राजक्ता ! प्राजक्ता ही माझी सून आहे. मुले लहान असताना व एकूणच , त्यांनी घरात स्वनियोजित अशी शिस्त पाळली होती. त्यांच्या मुलांनी शिस्त मोडलेली त्यांना अजिबात चालायची नाही. शिस्त मोडल्यास शिक्षा मिळे , त्या मुळे त्यांची दोन्ही ही मुले शिस्तप्रीय आहेत.
मदतीला दांडेकर म्हणजे, एक नंबर माणूस ! तुम्हाला मदत आवश्यक आहे , हे त्यांना कळायचा अवकाश , ते न बोलावता ,पडेल ती मदत करायला तयार असायचे. मदत करताना त्यांनी, प्रसंगी स्वतः झळ सोसून सुध्दा ,मदत केलेली आहे. हा त्यांचा मोठा वाखाणण्या सारखा गूण होता.
आपल्या नातेवाईंना धरून राहण्याचा ,त्यांचा स्वभाव होता. बायकोच्या माहेरच्या लोकांना ही, ते हवेहवेसे वाटायचे. नातेवाईंना आवर्जून भेटायचं , त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध रहावेत, या दृष्टीने आपले प्रेमाचे बंध ,त्यांनी निर्माण केलेले होते.
सौ. दांडेकरांचे निधन २०१० साली झाले. पत्नी गेल्या नंतर ,पुरूष पोरके होतात , असे म्हणतात . पण दांडेकरांनी मिरजेतच ,आपलं स्वतंत्र सर्कल निर्माण केलेलं असल्याने , त्यांनी एकटेपणावर सहजपणे मात केली होती. त्यांचा मुलगा अभय पुण्याला असतो व मुलगी म्हणजे माझी सून , आम्ही नाशिकला असतो. ते अधून मधून मुलाकडे व मुलीकडे येत जात असत . पण त्यांचा जास्त मुक्काम ,मिरजेतच असे.
दांडेकरांना ,कार ड्रायव्हिंग मना पासून आवडे. तसेच आपल्याला आवडणारी नवीन वस्तू बाजारात आली की , ती मोठ्या उत्साहाने ,ते खरेदी करीत असत. मिरज शहरातली पहिली टाटा नॅनो कार ,दांडेकरांच्याकडे होती. त्या वेळी त्यांची कार निघाली की, मिरजेतले लोक मोठ्या आदराने त्यांच्याकडे पहात. त्यांना ही ते मना पासून आवडे.
२०१५ साली दांडेकरांना, शेवटी कॅन्सरने गाठले. कॅन्सरचे निदान झाल्या पासून, तीन महिन्यांच्या आत ते गेले. त्या तीन महिन्यात त्यांचा मुलगा , सून , मुलगी यांनी त्यांची भरपूर सेवा केली.
अशा या दिलदार व्यक्तीमत्वाच्या, माझ्या व्याह्यांच्या नावा मागे , कै. हे अक्षर लावणे ,माझ्या मनाला वेदनादायकच आहे . पण इलाज नाही.

या लेखाच्या निमित्ताने त्यांना, " भावपूर्ण श्रध्दांजली " अर्पण करतो आणि थांबतो.
No comments:
Post a Comment