आज मी तुम्हाला ,एका वेगळ्याच व्यक्तीची ओळख करून देणार आहे ! त्यांचे नाव आहे श्री. दिलीप आपटे. त्यांना कोणी आदरणीय आपटे सर , आदरणीय आपटे गुरूजी, या नावाने ही ओळखतात . मी त्यांना लहानपणा पासून ओळखतो. मिरज शहरात आम्ही एकाच गल्लीत रहात होतो. पायाने अधू असलेला पण तल्लख बुध्दीमत्तेचा दिलीप सर्वांनाच माहिती होता. शैक्षणिक करीयर अतिशय उत्तम ! सांगली बॅंकेत उच्च पदावर नोकरी ! घरी पत्नी आणि दोन मुले ! सर्व ऐहिक सुखांचा लाभ घेत, संसार उत्तम चाललेला ! अचानक चेन्नईला बदली झाली. तिथले वातावरण आणि एकूणच, बॅंकेतल्या नोकरीचा कंटाळा आणि वीट आल्याने ,त्यांनी नोकरीचा राजिनामा दिला आणि मिरज गाठले.
पूर्वी संस्कृतचा व्यासंग होताच ! त्यांनी श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवताचा अभ्यास सुरू केला. उत्तम बुध्दीमत्ता असल्याने, त्यातील गुह्यतम ज्ञान अगदी थोड्या कालावधीतच त्यांनी आत्मसात केले. तसेच त्या अनुषंगाने वेद , उपनिषदे आणि इतर अध्यात्मिक ग्रंथ यातील ही ज्ञान, त्यांनी अल्पावधीतच ग्रहण केले . त्या नंतर ते स्वतः श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीमद् भागवतावर प्रवचन देउ लागले. त्यांच्या सुश्राव्य आणि ओघवत्या भाषेतील प्रवचनाने ,श्रोतृगण मंत्रमुग्ध होउ लागला. महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर ही, त्यांची प्रवचने होउ लागली. पण प्रकृति साथ देईना , तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या .
त्यातच त्यांनी मिरजेत " गीता फाउंडेशनची " स्थापना केली त्या फाउंडेशन तर्फे, " प्राजक्त " हे अध्यात्मिक पाक्षिक सुरू केले. त्यात तरूणांनी, आपले कर्तव्य कर्म चोख पार पाडावे ,पण त्याच बरोबर ,आपल्या समृृृृृृृध्द भारतीय तत्वज्ञानात्मक अध्यात्माचा अभ्यास ही करावा ,अशा आशयाचे लेख त्यांनी स्वतः लिहीले आणि आज ही लिहीत आहेत . स्वतःच्या गीता प्रवचनांचे पुस्तक , त्यांनी लिहून प्रसिध्द केले आहे. श्रीमद् भगवद् गीता आणि श्रीसमर्थांच्या दासबोधाच्या जशा परिक्षा असतात ,तशा श्रीमद् भागवताच्या परिक्षा घेण्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली , तो उपक्रम ही सध्या, गीता फाउंडेशन मार्फत हाती घेण्यात आलेला आहे.
मध्यंतरी मिरजेतच ,महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील अप्रगत मुलांच्यासाठी ,त्यांनी वर्ग घेतले. या वर्गांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच गीता फाउंडेशन मार्फत , हुषार पण परिस्थितीने शिकू न शकणार्या विद्यार्थ्यांना, आर्थिक मदत दिली जाते. हा उपक्रम ही उत्तमपणे आणि अव्याहत चालू आहे. या उपक्रमा मार्फत शिक्षण घेउन ,कांही विद्यार्थी डाॅक्टर , इंजिनीयर आणि वकील ही झालेले आहेत , होत आहेत .
विश्व शांती साठी , " विष्णूसहस्त्रनामाची " बारा कोटी आवर्तने, सामुहिक रीत्या करण्याचा संकल्प, त्यांनी सध्या सोडला आहे. या उपक्रमात माझ्या माहिती प्रमाणे, भारतातून आणि देशविदेशातून ,किमान वीस ते पंचवीस हजार श्रध्दाळू भक्तगण, सामील आहेत. नाशिक मध्येच किमान दहा ते पंधरा मंडळे वेगवेगळ्या मंदिरात किंवा घरात " विष्णूसहस्त्रनामाची " आवर्तने करीत असतात. या उपक्रमासाठी श्री. आपटे सरांनी ,स्वतंत्र वेबसाईट डिझाईन करून घेतली आहे.
समाजाच्या उत्थानासाठी, एक माणूस काय काय करू शकतो , याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून श्री. आपटे सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल !
श्री. आपटे सर हे अत्यंत साधेपणाने राहतात. ते समाज उत्थानासाठी एवढी कामे करतात, पण या कामांच्या मुळे निर्माण होऊ शकणार्या , अभिमानाचा किंवा अहंकाराचा लवलेश , त्यांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला कधी ही ,दिसणार नाही.
फोटोत दिसत आहेत ते श्री. दिलीप आपटे सर ! समाजोत्थानासाठी निरपेक्षपणे झटणार्या ,अशा या आदरणीय व्यक्तीमत्वाला शतशत प्रणाम !

No comments:
Post a Comment