आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे , ती अशा दांपत्याची की, ते दोघे ही उत्कृष्ठ चित्रकार आहेत , दोघे ही साहित्यिक आहेत , संगीत रसिकाग्रणी आहेत. परमेश्वर अशी जोडी, फार क्वचितच जमवतो. सर्व साधारणपणे ,जोडीतील नवरा बायको एकमेकांना पूरक असतात. पण एकमेकांची Mirror image असलेली जोडपी पहायला मिळणे ,हा भाग्य योगच म्हणायला हरकत नाही.
मी या बाबतीत नक्कीच भाग्यवान आहे. माझ्या माहितीतील डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर हे जोडपे असेच " एकमेकांचे प्रतिबिंब " असलेले एक दुर्मिळ असे जोडपे आहे.
दोघांना ही, चित्रकलेची अतोनात आवड आणि जाण आहे. स्वतःच्या बंगल्यात त्यांच्या दोघांच्या, चित्रे काढण्याच्या दोन स्वतंत्र खोल्या आहेत. सकाळचे सगळे अन्हिक आवरले की, साधारण अकराच्या सुमारास दोघेही आपापल्या खोलीत जाउन, वेगवेगळ्या विषया वरची सुंदर रंगसंती असलेली , पाहणार्याला नक्कीच आनंद देतील अशी चित्रे काढून, ते स्वतः ही आनंद मिळवतात. त्यांची चित्रे त्या क्षणी स्वानंदासाठीच असतात. दोघे ही एकमेकांची चित्रे पाहून मनमुराद आनंद लुटतात. मी दोघांची ही चित्रे पाहिली आहेत. खूपच छान आणि उत्तम चित्रांचा खजिना पाहिल्याचे समाधान ,मला निश्चितच मिळाले. त्या दोघांचे लग्न ही चित्रकलेच्या प्रेमापोटीच जमले आहे. डाॅक्टर शरद यांनी , साखरपुड्याच्या दिवशी आपल्या होणार्या भावी पत्नीला म्हणजे रोझा यांना ,( त्यांचे माहेरचे लाडके नाव रोझा आहे ) , सोन्याच्या अंगठी सह , एक उत्तम चित्रच भेट दिले. अशी ही आगळी वेगळी भेट ,त्यांना ही मनस्वी आवडली . हा एक वेगळा सुयोग आहे.
दोघांना संगीतामध्ये, जबरदस्त इंटरेस्ट आहे. जुन्या हिंदी गाण्यांचे, ते दोघे ही अक्षरशः वेडे आहेत . पूर्वी गाण्यांच्या रेकाॅड्स असत. त्याचा ही त्यांच्याकडे भरपूर साठा होता. नंतर कॅसेट्स आल्या , त्यांचा ही अमर्याद साठा त्यांनी केला , नंतर पेनड्राईव्ह्ज आले. त्यात एकावेळी हजारो गाण्यांचा संग्रह त्यांनी केला. मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळी " कारवाॅं " वर ते दोघे संगीतच ऐकत होते.
दोघांना साहित्याची ही प्रचंड आवड आहे. नामवंत साहत्यिकांचे साहित्य ते वाचतातच , पण त्या दोघांनी स्वतःची साहित्य निर्मिती ही केलेली आहे. सौ. सरोज वहिनींचा काव्य संग्रह आणि डाॅक्टरांचा स्फूट लेखांचा संग्रह प्रसिध्द झाला आहे.
थोडक्यात " Made for each other " असे हे जोडपे, परमेश्वराने अतिशय आनंदात असताना बनविलेले आहे. हा एक मोठा दुर्मिळ योग आहे. डाॅक्टर शरद म्हसकरांचे वय साधारण सत्त्याहत्तरच्या आसपास आहे . सौ. सरोज वहिनींचे ,त्यांच्या पेक्षा दोन पाच वर्षांनी कमी असेल. त्यांचा
" अानंदवन " हा बंगला , त्या दोघांच्या रसिकतेची साक्ष देणारा आणि चांगला ऐसपैस आहे. बंगल्यात वावरताना आणि बंगल्याचे आवार पाहताना , त्या दोघांच्या रसिक मनाची साक्ष पावलो पावली दिसते. बंगल्यात डाॅक्टरांनी स्वतः बनविलेल्या त्यांच्या आई , वडीलांच्या आणि एका नउवारी तील पुरंध्रीच्या , प्लास्टर आॅफ पॅरिसच्या निवडक मूर्ति, लक्ष वेधून घेतात.
डाॅ. शरद व सौ. सरोज वहिनी यांना दोन मुले व एक मुलगी आहे. एक मुलगा पुण्यात व बाकीचे दोघे परदेशात असतात. नाशिकमध्ये ते दोघेच असतात, पण छान स्वानंदात रममाण झालेले दिसतात.
डाॅ. शरद म्हसकर आणि सौ. सरोज म्हसकर यांना दोघांना " जीवेत शरदः शतम् " अशी सदिच्छा देतो व थांबतो.

No comments:
Post a Comment