माझा दर वर्षी ३१ आॅगस्टला वाढदिवस असतो. या वर्षीच्या माझ्या वाढदिवसाला मला ७३ वर्षे पूर्ण होउन ७४ वे वर्ष सुरू झाले. पण हा आताचा वाढदिवस एकदम स्पेशल होता. होता म्हणण्या पेक्षा मला तसा वाटला असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.
३१ आॅगस्ट रोजी मी नेहमी प्रमाणे सकाळी नाशिकच्या कृषी नगर जाॅगिंग ट्रॅकवर फिरायला गेलो. तिथे आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स ग्रुप " ने मोठ्या जल्लोषात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या , हा जल्लोष पाहून ट्रॅकवर फिरणार्या अनेक अनोळखी लोकांनी मला शुभेच्छा दिल्या.
सकाळी साधारण दहाच्या सुमारास माझा मेरीतील स्नेही श्री. राजाभाउ वर्हाडे आणि सौ. वहिनी आवर्जून आमच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आले. तसेच आमच्याच बिल्डिंगमध्ये खाली राहणारे श्री. सुनिल सानप आणि सौ. वहिनी हे दोघे ही आले. त्यांच्या अनपेक्षित शुभेच्छांनी मी अगदी भारावून गेलो.
माझ्या वाढदिवसा निमित्त आमच्या सकाळच्या फिरायच्या " निरामय जाॅगर्स " या ग्रुप मधील स्नेह्यांनी त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावरील अंबोली धरणाच्या शेजारच्या " टायगर व्हॅली " येथे दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते. हा परिसर एकदम छान आहे. धरणाच्या बॅक वाॅटर शेजारीच " टायगर व्हॅली " अाहे. माहौल एकदम मस्त आणि चिअरफुल्ल होता. गप्पाटप्पा , हास्यविनोद यात खूप छान वेळ गेला. जेवण होउन परतायला तीन वाजले होते.
तीन वाजता माझा आठवीच्या वर्गाचा मोफत क्लास होता. माझ्या वाढदिवसा निमित्त क्लासचे विद्यार्थी केक आणणार असल्याची बातमी मला आधीच मिळाली होती. मी विद्यार्थ्यांना आई बाबांच्या कडून पैसे घेउन माझा वाढदिवस साजरा करायचा नाही , असे निक्षुन सांगीतले. तरी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी कुठून कुठून रंगीत रंगीत फुले तोडून आणून , त्याचे स्वहस्ते गुच्छ बनवून आणून मला दिलेच ! मुलांच्या या " Creativity " ने मला निश्चितच आनंद मिळाला. त्या दिवशीचा अभ्यास पूर्ण झाल्यावर मुलांनी मला मधे उभे केले आणि " Happy birthday to you वगैरे गाणी आणि अभिष्ट चिंतनपर संस्कृत श्लोक म्हणून माझ्या भोवती फेर धरला. मुलांनी त्या दिवशी मला खूप खूप आनंद दिला.
रात्री घरचे सगळे आणि माझे मेरीतले मित्र , अनंत देशमुख आणि अनिल कुलकर्णी सहकुटूंब सहपरिवार यांचे सह बाहेर हाॅटेल " Big city " मध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो ही भोजन कार्यक्रम अतिशय आनंदात व मस्त मजेत पार पडला.
या नंतर दि. ३ सप्टेंबरला " त्र५षीपंचमी " होती. तिथीने माझा त्या दिवशी वाढदिवस असतो. त्या दिवशी आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुपला , सकाळचे फिरून झाल्यावर ,आमच्या नेहमीच्या गंगापूर रोड वरील आवडत्या " कृष्णविजय " या हाॅटेलात मी चहापान आयोजित केले होते. तो ही कार्यक्रम गप्पाटप्पा आणि हास्यविनोदात मस्त पार पडला.
असे चार कार्यक्रम माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने झाल्याने , मला खूप खूप आनंद आणि भरभरून समाधान मिळाले.
माझ्या क्लासच्या मुलांच्या सोबत त्या दिवशी काढलेला फोटो.

No comments:
Post a Comment