सन २०१९ मध्ये , आमचे मेरी आॅफिस मधील सहकारी ,श्री. बाळासाहेब अनकईकर त्यांचे ,वृध्दापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८३ होते.
कै. बाळासाहेब ," मेरी " या पाटबंधारे खात्याच्या संशोधन संस्थेत ,वरिष्ठ वैज्ञानिक होते. मृद् यांत्रिकी विभागात ते कार्यरत होते. तिथे चालणार्या ,त्रिदिक् कृंतन चांचणी ( Triaxial shear test ) करण्यात ,ते वाकबगार होते. त्यांच्या काळात ही चांचणी संपूर्ण ज्ञानासह करणारी माणसे ,महाराष्ट्रात ,हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतील किंवा नसतील ही !
कै. बाळासाहेब स्पष्टवक्ते होते , त्या मुळे सहजासहजी कोणी त्यांच्या वाट्याला जात नसे. पण त्याच बरोबर ,खरोखर अडलेल्या व गरजू माणसाला ,आर्थिक मदत करायला त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. आर्थिक मदतीचा दुरूपयोग होतोय असे दिसताच, त्या माणसाला धडा शिकविण्याची हिंमत दाखवावी, ती फक्त आणि फक्त कै. बाळासाहेबांनीच ! कै. बाळासाहेबांच्या सत्यवादी स्पष्टवक्तेपणाला, त्यांचा अधिकारी वर्ग ही दबून असे.
मेरीच्या वैज्ञानिकांची मान्यताप्राप्त संघटना होती. त्या संघटनेचे अध्यक्षपद, कै. बाळासाहेबांनी कांही वर्षे समर्थपणे सांभाळले.
कै. बाळासाहेब हे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या ," काळ्यारामाचे दर्शन " त्यांनी कधी ही चुकविले नाही. जाण्याचे आधी, प्रकृति अस्वास्थ्यामुळे ,त्यांना प्रत्यक्ष देवळात जाउन रामदर्शन घेणे जमेनासे झाल्यावर , काळाराम मंदिराचे दिशेने हात जोडून ,ते प्रार्थना करीत असत. रामाची त्यांच्यावर खरोखरच कृपा होती.
ते व्यवसायाने सोनार होते. पण त्यांनी व्यवसाय करताना, आपला प्रामाणिकपणा कधी ही नजरे आड केला नाही. शासकीय नोकरी आणि व्यवसाय, हे दोन्ही त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणेच केले. एका वेळी दोन्ही करायचे म्हणजे ,तारेवरची कसरतच होती , पण ती त्यांनी यशस्विपणे सांभाळली.
दर महिन्याला पायी त्र्यंबकेश्वरला जाउन ,त्र्यंबकेश्वराचे आणि निवृत्तीनाथ समाधीचे दर्शन घेणे ,हा त्यांचा परिपाठ ,अनेक वर्षे चालू होता.परमेश्वरावर त्यांची अनन्य साधारण निष्ठा होती. परमेश्वराची निष्ठा आणि रोजच्या जीवनातील व्यवहार ,यांची सांगड घालणे फार थोड्यांना जमते. कै. बाळासाहेब ,हे अशा थोर व्यक्ती पैकी एक निश्चितच होते .त्यांनी हा तोल सांभाळला आणि समृध्द ,समाधानी जीवनाचा आनंद मिळविला.
कै. बाळासाहेबांच्या शेवटच्या आजारपणात ,त्यांच्या पत्नीने , मुलाने , मुलीने , जावयाने आणि आप्तेष्टांनी त्यांची खूप काळजी घेतली. पण शेवटी एकवेळ अशी येते की , जिथे मानवी प्रयत्न संपतात आणि मानवाला अनंताच्या प्रवासाला जावेच लागते.
कै. बाळासाहेब अनकईकरांच्या आत्म्याला, परमेश्वराने चिरशांती द्यावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
।। ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

No comments:
Post a Comment