आज मी तुम्हाला मिरजेच्या माझ्या एका जवळच्या स्नेह्याची ओळख करून देणार आहे. या माझ्या घनिष्ठ स्नेह्याचे नाव आहे श्री. विवेकराव पेंडसे. मी त्यांना विवेकराव असं म्हटल्यानं तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल. स्नेही आणि विवेकराव ? कांही तरी चुकतय ! मी त्यांना आदराने विवेकराव असं म्हणतो.
मग मला आदर वाटावं असं त्यांच्याकडे काय आहे ? असं तुम्हाला वाटेल. विवेकरावांच्याकडे आदर वाटाव्या अशा अनेक गोष्टी आहेत. पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन ! विवेकराव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून ( ST मधून) अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. ते मेकॅनिकल इंजिनियर असल्याने ST च्या तांत्रिक विभागात कार्यरत होते. ST मधील लोकांना पेन्शन नसते. विवेकरावांना सेवानिवृत्त होउन अंदाजे बारा वर्षे झाली असतील. पण त्यांचे आर्थिक नियोजन अत्यंत व्यवस्थित असल्याने , त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्वी सारखेच म्हणजे सुव्यवस्थित चालू आहेत. पैशासाठी ते कधी अडचणीत आले नाहीत. मला ही बाब फार महत्वाची वाटते.
विवेकरावांचा स्वभाव स्पष्टवक्ता आहे. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते भिडभाड न बाळगता स्पष्टपणे सांगतात. पण मैत्री किंवा स्नेह त्याला अपवाद आहे. मैत्रीत किंवा स्नेहात सर्व माफ करण्याचा त्यांचा स्वभाव , मला महत्वाचा वाटतो. तुमची व त्यांची मैत्री किंवा स्नेह नसेल व जर तुम्ही चुकलात तर ते तुम्हाला वाजविल्या शिवाय सोडणार नाहीत. मिरजेतल्या एका उद्योगपतिच्या मुलाला , त्याचे कुत्रे विवेकरावांच्या अंगावर धावून आल्याने त्यांनी असे कांही सुनावले होते की , विवेकरावांचा तो अवतार पाहून मी पण घाबरून गेलो होतो.
विवेकरावांना ओरिगामीची खूप आवड आहे. कागदाचे वेगवेगळे पक्षी , प्राणी त्यांना अतिशय उत्तम प्रकारे तयार करता येतात. हे पण मला वैशिष्ठ्यपूर्णच वाटते.
विवेकरावांच्या मिसेस ( सौ. अरूणाताई )जाउन अंदाजे पाच वर्षे झाली असतील. विवेकरावांनी व त्यांच्या मिसेसनी दोघांनी " देहदान " करण्याचा संकल्प सोडला होता. त्या नुसार सौ. अरूणाताईंच्या निधना नंतर त्यांनी त्यांचा देह मिरज मेडिकल काॅलेजला दान केला. ही गोष्ट पण मला खूप खूप महत्वाची वाटते. विवेकरांच्या पासून मी पण या बाबतीत प्रेरणा घेतली आहे.
विवेकरावांना तीन मुली. तिन्ही मुलींची लग्ने होउन त्या आपापल्या संसारात छान रममाण झालेल्या आहेत. विवेकराव कारण परत्वे मुलींच्याकडे आवर्जून जातात . पण सर्वसाधारणपणे ते मिरजेत आपल्या फ्लॅट मध्ये एकटे राहणे पसंत करतात . त्यांना सिलेक्टेड असे मित्र जोडायची कला अवगत असल्यानं , त्यांच्या घरी मित्रमंडळींचा भरपूर राबता असतो. कोणी गप्पा मारायला , कोणी पत्ते खेळायला , कोणी कांही तरी त्यांच्या कडून शिकायला असे येत असतात. " विठू माझा लेकूरवाळा " असे त्यांचे घर असते.
अशा या माझ्या खूप जवळच्या स्नेह्याला परमेश्वराने उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे , अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.

No comments:
Post a Comment