सन् २०००. जानेवारी महिना. मी त्या वेळी सांगलीत, पाटबंधारे खात्याच्या, गुण नियंत्रण ( Quality Control ) शाखेत ,कार्यरत होतो. अनपेक्षित पणे माझे वैज्ञानिक अधिकारी या पदावर ,प्रमोशन झाले .माझी मेरीत ( M.E.R.I. , पाटबंधारे खात्याची संशोधन संस्था ) नाशिकला बदलीची आॅर्डर आली . प्रमोशनचा आनंद होण्या ऐवजी, मी मनाने दुःखी झालो. मिरजेत आम्ही सगळे, म्हणजे मी , पत्नी सौ. रजनी , मुलगा चि. आदित्य , माझी आई , वडील असे सगळे एकत्र होतो.आईचे वय ७३, वडीलांचे वय ८३ होते. मी मिरजहून नाशिकला गेलो ,तर त्यांचे कसे होईल ?
या विचारातच , मी माझे स्नेही श्री. नंदकुमार अभ्यंकर यांचे घरी, सहज गेलो. माझ्या मनातील काहुर, मी त्यांना सांगीतले. त्यांनी शांतपणे माझी व्यथा समजून घेतली. क्षणभर विचार केला. नंतर ते मला म्हणाले " दीक्षित , तुमच्या मिरजेत असण्यामुळे ,तुमचे कुटूंब सुरक्षित आहे . तुमचे आई, वडील वृद्ध आहेत. तुम्ही मिरजेत त्यांच्या सोबत असल्या मुळे ,त्यांच्या तब्बेती व्यवस्थित आहेत , असा तुमचा समज आहे. हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही नाशिकला गेलात की, लगेच त्यांच्या तब्बेती बिघडतील , असा तुमचा समज असेल , तर तो चुकीचा आहे. जो तो आपल्या नशिबाने जगत असतो . त्याचे पितृत्व अहंकाराने स्वतःकडे घेणे सर्वथैव गैर आहे , चुकीचे आहे. "
हे सर्व ऐकून माझ्या मनात लख्ख प्रकाश पडला . मनातील सर्व जळमटे निघून गेली व मी अतिशय आनंदाने, एकटा प्रमोशनवर, नाशिकला निघून गेलो.
श्री. नंदकुमार अभ्यंकरांच्या या समजावण्याचा, माझ्या मनावर खूपच परिणाम झाला . त्या दिवसा पासून ,मी त्यांना, मनोमन " गुरू " मानू लागलो. आज तागायत ते मला ,गुरूस्थानीच आहेत व पुढे ही राहतील.श्री. अभ्यंकरांचा अध्यात्माचा अभ्यास ,जबरदस्त आहे. भगवद् गीता , ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकारामाची गाथा , संत कबीर यांचे विचार वाङ्गमय आणि इतर बर्याच संत वाङ्गमयाचा ,साहित्याचा त्यांचा अभ्यास , त्या वरचे त्यांचे मनन आणि चिंतन , प्रचंड आहे.
ते सांगलीच्या गणपतराव अरवाडे हायस्कूलच्या ,ज्युनियर काॅलेजच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख होते. आता नुकतेच ,ते सेवानिवृत्त झालेले आहेत. शिक्षण क्षेत्राशी त्यांचा संबंध असल्याने , मुलांच्या मानसशास्त्राचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. त्या मुळे ओळखीची ,तसेच ओळख नसलेली , मुले आणि पालक मुलांच्या शैशणिक , मानसिक अडचणी सोडविण्यासाठी ,त्यांच्याकडे आवर्जून येत असतात . त्यांचा सल्ला घेत असतात.
ते स्वतः अटोमोबाईल इंजिनीयर आहेत.मिरजेत त्यांचे स्वतःचे ,अटोमोबाईल वर्कशाॅप होते. खूप चांगले चालायचे. त्या व्यवसायात त्यांनी नाव कमावले होते. एक दिवस त्यांनी ते वर्कशाॅप, त्यांच्या हाताखाली बरेच वर्षे काम करणार्या कर्मचार्याला ,देउन टाकले. मी या व्यवसायात भरपूर पैसा कमवला. आता मला पैसा नको, हा त्यांचा विचार होता. माझ्या किंवा तुमच्या ही माहितीत " मला आता पैसा नको " ,असे म्हणणारा हा पहिलाच माणूस असेल. पैशाचा मोह प्रत्येकाला असतो. म्हातारपणी ही पैशाच्या मागे पळणारी माणसे ,आपण पाहिली असतील. पण तरूणपणी मला पैसा नको , असे म्हणणारे श्री. अभ्यंकर , एकमेवाव्दितीय असेच आहेत.
त्यांना एक मुलगा आहे. एक नातू ही नुकताच झालेला आहे. मिरजेत किल्ला भागात , त्यांचा स्वतःचा बंगला आहे. पण आपण नातवंडा सोबत ,आनंदात रहावे , या उद्देशाने ,श्री. आणि सौ, अभ्यंकर दोघेही सध्या पुण्यात, मुला सोबत राहतात. सौ. वहिनींची ही त्यांना समर्थ साथ आहेच !
तर अशा या मला आदराने ,गुरूस्थानी असलेल्या श्री. नंदकुमार अभ्यंकर आणि सौ. वहिनी, यांना परमेश्वराने उदंड निरामय आयुष्य द्यावे आणि त्यांचा कृपालाभ मला सतत मिळावा , हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

No comments:
Post a Comment