आज मी तुम्हाला ,डाॅ. मिलिंद शहा, यांची ओळख करून देणार आहे. तुम्हाला वाटेल की ,त्यांच्या औषधपाण्याने मला किंवा आमच्या घरातील कुणाला, खूप चांगला गूण आला असेल , म्हणून मी त्यांची ओळख करून देतोय. पण तसं मुळीच नाहीय.
नाशिक मधील ,आमच्या सकाळच्या फिरायच्या ग्रुप मधील, श्री. नवनीतभाई यांचे ते थोरले चिरंजीव ! डाॅ. मिलिंद , M.S. ( General Surgen ) आहेत. ते नाशिकच्या अपोलो हाॅस्पिटल मध्ये, जनरल सर्जन या नात्याने, कार्यरत आहेत. त्यांचे दिवसभराचे शेड्यूल, अतिशय बिझी असते. डाॅ. मिलिंद यांचे आजचे वय आहे ५८ वर्षे. ते स्वतःच्या फिटनेस बाबत ,अतिशय जागरूक आहेत. वयाच्या ५८ व्या वर्षीही ते ,४२ किमी ची मॅरॅथाॅन पळू शकतात. दर रविवारी किंवा आपल्या कामाचा व्याप सांभाळून ते , इतर दिवशी ही शक्य असल्यास , किमान १० ते २० किमी धावतात. त्यांच्या बरोबर त्या वेळी ,त्यांच्या पत्नी डाॅ. सौ. संगीता ,या सुध्दा असतात. मॅरॅथाॅन कशी पूर्ण करावी ,याचा शास्त्रोक्त अभ्यास डाॅ. मिलींद यांनी केला आहे. या बाबतीतली असंख्य पुस्तके विकत घेउन, त्यांनी स्वतःच्या संग्रही ठेवलेली आहेत. भारतात कुठे ही मॅरॅथाॅन असली तर ,शक्यतो आपला कामाचा व्याप सांभाळून, शक्य असल्यास , ते त्यात आवर्जून भाग घेतातच !
आणखीन एक त्यांचा विशेष गूण म्हणजे , ते मातृपितृ भक्त आहेत. त्यांचे वडील म्हणजे आमचे श्री. नवनीतभाई , यांचे आजचे वय आहे ८७ वर्षे आणि त्यांच्या पत्नीचे वय असेल साधारण ८२ किंवा ८३ वर्षे. श्री. नवनीतभाईंची तब्बेत उत्तम आहे , पण त्यांच्या पत्नीला कंपवाताचा त्रास आहे. त्या कुठे बाहेर जाउ शकत नाहीत. आपल्या आई वडीलांची या वयाची गरज ओळखून, डाॅ. मिलिंद ,आपल्या आई वडीलांना आपला सहवास आवर्जून देतात. आजच्या काळात मुले बिझी असतात , त्यांना आपल्या आई वडीलांना द्यायला वेळ असतोच असे नाही. काळा नुसार ते योग्य ही असेल. पण डाॅ. मिलिंद सकाळी अपोलो हाॅस्पिटलला जाण्या पूर्वी, अावर्जून आपल्या आई वडीलांच्या जवळ बसून ,थोडा वेळ त्यांची चौकशी करतात. उशीरा संध्याकाळी हाॅस्पिटल मधून आल्यावर प्रथम, आपल्या आई वडीलांच्या खोलीत जातात , त्यांच्याशी दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टींची चौकशी करतात व मगच आपल्या खोलीत जातात. रात्री उशीरा ,जेवण झाल्यावर , परत ते आई वडीलांच्या खोलीत येतात , आई वडीलांच्या जवळ बसून , आईचे हात पाय दाबून देतात , प्रेमाने त्यांची चौकशी करून गप्पा मारून मगच आपल्या खोलीत झोपायला जातात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम आहे. कधी तरी पेशंट्सची गर्दी असेल किंवा जास्त आॅपरेन्स असतील तर, यात थोडाफार बदल होतो , अन्यथा यात बदल होत नाही. डाॅ. मिलिंद यांची पत्नी डाॅ. सौ. संगीता यांची ही, डाॅ. मिलिंद यांना संपूर्ण साथ आहे. हे आजच्या काळात दुर्मिळातले दुर्मिळ दृष्य आहे.
डाॅ. मिलिंद यांची बहीण डाॅ. सौ. श्रध्दा या ही आपल्या भावा प्रमाणेच आहेत. त्या ही नाशिकमध्येच असतात. डाॅ. मिलिंद यांना एक भाउ आहे . तो नोकरी व्यवसाच्या निमित्ताने दिल्लीला असतो.
डाॅ. मिलींद म्हणजे आजच्या काळातील " श्रावण बाळ " च !
खाली फोटोत दिसत आहेत ते म्हणजे डावीकडून पहिले श्री. नवनीतभाई , मध्ये दिसतात त्या त्यांच्या पत्नी आणि " डाॅ. मिलींद " !

No comments:
Post a Comment