आज काल असे दिसते की , आई आणि वडील भारतात आहेत आणि मुले नोकरीच्या निमित्ताने परदेशात !यात गैर कांहीच नाही. मुले आपल्या प्रगतीसाठी पंख पसरतात , आई वडील मुलांच्या प्रगतीच्या आड न येता ,आनंदाने त्यांना निरोप देतात. पुढे जसजसे दिवस , महिने आणि वर्षे जातात , तसतसे वय झाल्याने ,भारतात असलेल्या आई वडीलांना, एकटेपणा जाणवतो. मुलांचा आणि विशेषतः नातवंडांचा ,सहवास हवा हवासा वाटतो. पण ते अनेक दृष्टींनी शक्य नसते. वयोपरत्वे, हे दोघे तिकडे जाउ शकत नाहीत आणि मुले तिकडेच नोकरी व्यवसायात आणि आपल्या संसारात रमल्याने, इकडे येउ शकत नाहीत. अशी मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण होते की , ज्यातून मार्ग काढणे ,दोघांना ही अशक्य होउन बसते .
पण माझ्या माहितीतला एक मुलगा ,असा आहे की , त्याने परदेशातील आपली नोकरी सोडून , तिकडचे सर्व आवरून , तो केवळ आपल्या आई वडीलांच्यासाठी, भारतात परत आला आहे. परदेशात तो त्याच्या कंपनीत अत्युच्च पदावर होता. पगार ही आपल्या कल्पनेच्या पलीकडचा होता , मानमरातब होता , मोठाच्या मोठा कंपनीने दिलेला बंगला होता , पण ते सर्व सोडून ,आपली पत्नी आणि मुलासह तो भारतात परत आलेला आहे.
या मुलाचे नाव आहे चि. अजय मधूसुदन खरे. आपले आई वडील ,आता वृध्द झालेले आहेत व त्यांना आपली गरज आहे, या जाणीवे पोटी , परदेशातील नोकरी सोडून येणारा, माझ्या माहितीतला हा पहिलाच मुलगा !
अशा प्रकारे तिकडची नोकरी सोडून येणे , मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या, किती कठीण असेल ,त्याची आपल्याला कल्पना येणार नाही. पण केवळ आई वडीलांच्या प्रेमापोटी ,तो आला आहे. त्याच्या पत्नीची आणि मुलाची त्याला संपूर्ण साथ आहे , हे पण फार महत्वाचे आहे. समजा , मुलगा म्हणून त्याला इकडे यावेसे वाटले असते , पण त्याच्या पत्नीने व मुलाने, ह्या प्रस्तावास नकार दिला असता , तर तो एकटा, एवढा मोठा निर्णय घेउच शकला नसता. पण सर्वांनी एकमताने निर्णय घेउन, ते इकडे भारतात परत आले , ही फार फार दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट आहे , असे माझे स्पष्ट मत आहे.
धन्य तो मुलगा ,त्याचे कुटूंब आणि धन्य ते आई वडील , की ज्यांच्या साठी मुलगा प्रेमाने , परदेशातील सर्व ऐहिक सुखे सोडून ,भारतात परत आला.
खाली फोटोत दिसत आहे तो हाच, चि. अजय खरे !

परमेश्वराने या खरे कुटूंबियांच्या वर, सर्व प्रकारच्या सुखाचा आणि आनंदाचा वर्षाव सतत करावा , हीच सदिच्छा देतो आणि थांबतो.
No comments:
Post a Comment