आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे, त्यांचे नाव आहे, श्री. रामचंद्र लिंगो कुलकर्णी , कारदगेकर ! माझ्या मुलीचे सासरे ! आम्ही त्यांना रामभाऊ म्हणतो.
महाराष्ट्र शासनाच्या , वन विभागातून १९९७ साली ते सेवा निवृत्त झाले. नोकरीच्या काळात ,त्यांनी आपली नोकरी अतिशय प्रामाणिकपणे केली. पगारा व्यतिरिक्तच्या पैशाला अजिबात हात लावला नाही. त्यांच्या या निरपेक्षवृत्ती मुळे, आज ही त्यांना, त्या काळी त्यांचे असलेले सहकारी आणि अधिकारी नावाजतात.
आज काल शेती असलेले, आणि स्वतः कसणारे ,ब्राह्मण खूप कमी आहेत. श्री. रामभाऊ आणि त्यांच्या पत्नी सौ. लिलाताई यांनी ,वडीलोपार्जित मिळालेली शेती, अखबंद जशीच्या तशी राखली आहे. मला वाटतं १९५५ /५६ साली केंव्हा तरी ,महाराष्ट्रात कूळ कायदा लागू झाला. त्या वेळी श्री. रामभाऊंनी ,आपल्या कूळा बरोबर तडजोड करून ,आपली शेती राखली , यात त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
श्री. रामभाऊ फणसा सारखे आहेत. ते स्पष्टवक्ते आहेत. पण त्या स्पष्टवक्तेपणा मागे, समोरच्याच्या बद्दल ,त्यांच्या मनात वसत असलेला जिव्हाळा आणि आपुलकी ,ज्याला दिसते किंवा जाणवते , त्याला त्यांचा स्पष्टवक्तेपणा कधीच खटकत नाही.
श्री. रामभाऊंच्यात स्टेज डेअरिंग जबरदस्त आहे. मोठ्या मोठ्या समुदाया समोर ,त्यांना अचानक कुणी बोलायला सांगीतले , तर ते अस्खलितपणे अर्धा पाउण तास सहजपणे , आपले विचार सुसंगतपणे मांडू शकतील.
श्री. रामभाऊंनी कांही काळ, पत्रकारिता ही केलेली आहे. पत्रकारिता करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. पण ती त्यांनी यशस्वीपणे केली , ही आगळी वेगळी गोष्ट आहे.
श्री. रामभाऊंची दिलदारवृत्ती आहे. आपल्या शेतात एखादी गोष्ट भरपूर पिकली, तर ती आपल्या नातेवाईकांना ते आवर्जून ,स्वतः नेउन ,आनंदाने देत असत. आपल्याकडे जे विपुल आहे ,ते दुसर्यांना देण्यात, त्यांनी कधी ही हयगय केली नाही.
श्री. रामभाऊ म्हणजे कष्टाळू माणूस ! शेती करताना, ते कष्टाला कधी ही मागे हटले नाहीत. शेतीत कामासाठी लावलेले गडी, व्यवस्थित काम करतात की नाही , कोणत्या कामाला किती वेळ लागतो , याचे गणित स्वतः ते काम करून ,त्यांनी ठरविलेले असल्याने , काम करणार्या गड्यांच्या गमजा ,त्यांच्या समोर कधी ही चालल्या नाहीत. या बाबतीत त्यांचा रोखठोक व्यवहार असे. श्री समर्थ रामदास स्वामी " दासबोध " ग्रंथात म्हणतात त्या प्रमाणे , माणसाने प्रत्येक व्यवहार चतुरपणे करावा. असा चतुरस्त्रपणा, श्री. रामभाऊंच्या व्यक्तीमत्वात ,जन्मजातच आहे.
मध्यंतरी श्री. रामभाऊ बरेच आजारी होते. त्या आजारातून ते उठतील किंवा कसे, असे वाटत होते. पण सकारात्मक विचार आणि जगण्याची जबरदस्त जिद्द बाळगून त्यांनी, त्या आजारावर मात केली व आज वयाच्या ८१ व्या वर्षी ,ते उत्तम निरामय आयुष्य व्यतीत करीत आहेत.
श्री. रामभाऊंना दोन मुले. थोरले चिरंजीव अभियंता आहेत व धाकटे चिरंजीव म्हणजे माझे जावई नामांकित वकील आहेत. दोन्ही मुले , सुना , नातवंडे आणि त्यांच्या पत्नी सौ. लिलाताई ,सर्वजण आज ही त्यांच्या आज्ञेत आहेत , ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
अशा या माझ्या व्याह्यांना म्हणजे श्री. रामभाऊंना, पुढील उत्तम आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.